पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

अजित पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी राज्यात सरकार स्थापनेचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी अजित पवारांनी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या प्रकारानंतर राष्ट्रवादीने अजित पवारांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यांना पक्षातून बाहेर काढण्याची कारवाई न करता त्यांच्या परतीचा मार्ग कायम ठेवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरल्याचे दिसते.

'एक भगतसिंह देशासाठी फाशीवर गेले तर एकानं लोकशाहीची हत्या केली' 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सत्तास्थापनेसाठी अखेरच्या टप्प्यातील तयारी सुरु असताना पक्षाला विश्वासात न घेता काही आमदारांच्या साथीने अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली. राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून ५४ आमदारांचा भाजपला समर्थन असल्याचा दावा त्यांनी शनिवारी राज्यपालांसोबत केला. भाजपच्या या खेळीनंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत भाजपकडे बहुमत नसल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पाचपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. पण अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे भाजपचा डाव फसला आहे.