पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी

अजित पवार

पक्षाला कोणतीही पूर्व कल्पना न देता भाजपच्या गोटात सामील झाल्यामुळे अजित पवार यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वाय. बी. सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून एका परिपत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. गटनेतेपदावरुन त्यांना हटवण्यात आले असले तरी राष्ट्रवादी पक्षातून त्यांना बाहेर काढण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या परतीचे दरवाजे उघडे आहेत, असे म्हणता येईल.     

बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या : काँग्रेस  

त्यांचा व्हिप काढण्याचा अधिकार काढून घेण्यात आल्याचा उल्लेखही या पत्रकामध्ये करण्यात आला आहे. शनिवार २३ नोव्हेंबरपासून विधीमंडळनेतेपदाचे सर्व अधिकार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे सत्तास्थापनेची चर्चा अखेरच्या टप्प्यात असताना शनिवारी सकाळी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्यातील सर्वांनाच धक्का दिला होता.

धनंजय मुंडे बैठकीला आल्यावर सुप्रिया सुळेंनी अशी दिली प्रतिक्रिया

राज्यात लागू असणारी राष्ट्रपतीराजवट पहाटेच संपुष्टात आणत राजभवनात मोजक्या आमदारांच्या उपस्थितीत शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. अजित पवारांनी अंतर्गत चर्चेदरम्यान राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतलेले पत्र राज्यपालांसमोर सादर केले असावे, असा सशंय खुद्द शरद पवारांनी व्यक्त केला होता. शपथविधीच्या वेळी अजित पवारांसोबत असणारे सर्व आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे नक्की पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.