अजित पवार हे संपर्कात नसल्याच्या बातमीत तथ्य नाही, सतत येणाऱ्या कॉल्समुळे त्यांनी जाणीवपूर्वक आपला फोन बंद केला आहे, असं राष्ट्रवादींच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट करत सारं काही आलबेल असल्याचं सांगितलं आहे.
'कितीही चौकशा करा आम्हाला काहीही फरक पडणार नाही'
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब झाला असला तरी उपमुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार याचं कुतूहलही सामान्य जनतेला आहे. अशातच बंड करून सत्ता स्थापनेसाठी भाजपला साथ दिलेल्या आणि तीन दिवसांत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या अजित पवारांचं नाव या पदासाठी चर्चेत आहे. मात्र अजूनही अजित पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे अजित पवार नाराज असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याच्या बातम्या माध्यमात वाऱ्यासारख्या पसरू लागल्या आहेत.
'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय'
NCP spokesperson, on reports that Ajit Pawar has switched off his mobile phone: Ajit Pawar (in file pic) has not gone incommunicado, he has intentionally switched off his mobile phone to avoid frequent calls. He will attend the swearing-in ceremony. pic.twitter.com/exRRHnCTsl
— ANI (@ANI) November 28, 2019
यावर राष्ट्रवादीनं स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवारांशी संपर्क तुटलेला नाही. सतत येणाऱ्या कॉल्समुळे त्यांनी जाणीवपूर्वक फोन बंद ठेवला आहे. ते शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत, असं पक्षानं एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
... म्हणून मोदी परदेश दौऱ्यांवेळी हॉटेलमध्ये उतरणे टाळतात