पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांना 'ब्लॅकमेल' केलंय, संजय राऊत यांचा आरोप

संजय राऊत (ANI)

अजित पवार परत येण्याची शक्यता आहे. त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे सर्व आम्ही जनतेसमोर आणणार असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाल्याचेही सांगितले. हिम्मत असेल तर भाजपने बहुमत सिद्ध करुन दाखवावेच, असे आव्हानही त्यांनी दिले.

केंद्राचा महाराष्ट्रावर 'फर्जिकल स्ट्राईक', उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप

चंद्रकांत पाटलांनी तोंड सांभाळून बोलायचं असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची ही अवस्था झाल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत आक्रमक झाल्याचे दिसले. भाजपने चोरासारखी वर्तणूक करु नये. अंधारात पापे केली जाते, असेही ते म्हणाले.

सदनात भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही - शरद पवार

अजित पवारांबरोबर गेलेल्या ८ आमदारांपैकी ५ आमदार परतले आहेत. त्यांना खोटे बोलून कारमध्ये किडनॅप केल्यासारखे बसवून नेले. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करुन दाखवावेच, असे आव्हानही त्यांनी दिले.

'..अजित पवार अचानक उठले आणि वकिलाकडे जायचं म्हटले'