पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांनी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केलीः राऊत

अजित पवार

अजित पवारांनी आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक केल्याचा आरोप शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

'विधिमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची नियुक्ती अवैध'

यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. अजित पवार यांनी नेलेल्या बनावट कागदावरुन सत्ता स्थापन केली आहे. त्यांनी आमदारांना फसवून राजभवनात नेले होते. शिवसेना-राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत दिली जाते. तर भाजपला ८ दिवसांची मुदत दिली जाते. यातूनच सर्व समजते, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही १० मिनिटांत सर्व १६५ आमदार परेडसाठी राजभवनात नेऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवार हे लोकनेते आणि देशाचे नेते असल्याचे ते म्हणाले.

भाजपला मी चांगला व्यापारी समजत होतो. पण त्यांनी व्यापार सचोटीचा केला असता, प्रामाणिकपणे केला असता तर त्यांना असे दारोदारी फिरावे लागले नसते. त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. 

NCPचे आमदार मुंबईतील हॉटेल रेनेसान्समध्ये

राज्यपालांच्या नावात भगवान आहे. ईश्वर हे आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहेत. पण ते आम्हाला एक न्याय देतात आणि त्यांच्या पक्षाला एक न्याय देतात, हे दुर्देव आहे. राज्यपालांनी आमदार फोडण्यासाठी त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत वेळ दिली आहे.

सीबीआय, ईडी, प्राप्तीकर विभाग आणि पोलिस हे चारजण त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. सध्याचे राज्यपालही त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण भाजप आता त्यांच्याच जाळ्यात अडकली आहे. आता त्यांचा शेवट सुरु झाला आहे.

'चोरी-चोरी चुपके चुपके स्थापन झालेले सरकार टिकणार नाही'