पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करु: अजित पवार

अजित पवार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय नेत्यांचे पक्षांतर सुरुच आहे. अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजपने वेटिंगवर ठेवलेले काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, शिवसेना आणि भाजपचे अनेक नाराज आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. अजित पवार यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. 

होय, मी निवडणूक लढवतोय - आदित्य ठाकरे

निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांसह आमदारांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला धक्का बसत आहे. असे असताना आता काँग्रेसचे भारत भालके आणि सेनेचे दौलत दरोडो यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी 'सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार आहोत', असे अजित पवार यांनी सांगितले.

अजितदादांविरोधात मुख्यमंत्री ढाण्या वाघाला मैदानात उतरवणार

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मदतार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही आघाडीचा उमेदवार उभा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचितमधून भाजपमध्ये घरवापसी केलेल्या गोपीचंद पडळकर यांना बारामतीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले होते. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले असून लाखांहून अधिक मताधिक्यांनी मैदान मारु, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

शिवस्मारक प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा : काँग्रेस