पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्तास्थापन करणाऱ्यांना शुभेच्छा! फडणवीसांचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांनी काही कारणास्तव आमच्यासोबत येण्यास नकार दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण राजभवनात जाऊन राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले. जनतेने आम्हाला महाजनादेश दिला होता. या महाजनादेशाचा आदर राखून आम्ही विरोधी बाकावरुन जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करु, असेही ते म्हणाले. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी सत्तास्थापना करणाऱ्यांना शुभेच्छा! असा उपरोक्त टोलाही त्यांनी लगावला.  

अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला महाजनादेश दिला. शिवसेनेच्यासोबत निवडणूक लढलो.  दुर्देवाने जी गोष्ट कधीही ठरली नव्हती त्याची मागणी शिवसेनेने केली. त्यांनी आकड्यांचा खेळ करत मुख्यमंत्रीपदावरुन राजकारण सुरु केले. अनेक दिवस त्यांची वाट पाहिली पण आमच्याशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा करत होते. अनेकांच्या पायाऱ्या झिजवत होते पण आमच्याशी बोलायला तयार नव्हते, असा टोला त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला. 

गेल्या तीन दिवसांतील कोर्टाच्या लढाईतील १० महत्त्वाच्या घडामोडी

शिवसेना आमच्यासोबत नसल्यामुळे आम्ही बहुमत सिद्ध करु शकलो नव्हतो. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रवादीचा एक गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सरकार स्थापन केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उद्या आम्हाला बहुमत सिद्ध करायचे होते. अजित पवारांनी वैयक्तिक कारणास्तव उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आल्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलेल नाही. पहिल्या दिवशीपासून आम्ही कोणाचे आमदार फोडणार नाही ही भूमिका घेतली होती. संपूर्ण राष्ट्रवादीचा गट आमच्यासोबत आल्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेमध्ये पुढाकार घेतला होता, असेही ते म्हणाले.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ajit Pawar backed out and we didnt want to resort to horse trading so we have decided to resign says CM Fadnavis