पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत राष्ट्रवादीचे मौन

अजित पवार

महाविकास आघाडीच्या नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीपूर्वी मुंबई येथील वाय.बी. सेंटरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील उपस्थित होते. ही बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तोकड्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. बैठकीत खातेवाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

महाविकास आघाडीत या पक्षाकडे जाणार ऐवढी मंत्रिपदं?

अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे टाळले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याच्यासह अजित पवारांना संधी मिळणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. प्रफुल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद हे एकच असून ते राष्ट्रवादीकडे राहणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीकडून दोन नावे रात्री उशीराने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

शपथविधीसाठी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि केजरीवालांना निमंत्रण

अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.