पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध; तरुणांनी पाठवला दोन हजारांचा चेक

सुजय विखे-पाटील

'भाजपचे कमळ चालत नसेल तर दोन हजार रुपये परत करा' असे वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत शेतकरी पुत्रांनी सुजय विखे-पाटील यांना दोन हजाराचा चेक पाठवून दिला आहे. या शेतकरी पुत्रांनी सुजय विखेंना पत्र पाठवून त्यासोबत दोन हजाराचा चेक जोडला आहे. सुजय विखेंनी अशाप्रकारचे वक्तव्य करुन शेतकऱ्यांचा अपमान केल्याचे मत या शेतकरीपुत्रांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

पत्र पाठवून शेतकरी पुत्रांनी केला निषेध

 

'मन की बात'चे 'मौन की बात' होऊ देऊ नका, शशी थरूर यांचे मोदींना पत्र

कर्जत-जामखेड मतदार संघातील पालकमंत्री आणि भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारसभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभे दरम्यान सुजय विखे-पाटील यांनी असे म्हटले की, ‘पालकमंत्र्यांनी विरोधी उमेदवाराच्या सभेला जाणाऱ्या लोकांची यादी काढावी. त्या सभेला जाणाऱ्या अनेकांच्या खात्यात मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको? तुम्हाला कमळ चालत नसेल तर दोन हजार रुपये परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी ते वापरता येतील.’ असे वक्तव्य सुजय विखेंनी केले होते.  

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेवरून गोंधळ, SPG सुरक्षा काढण्याची चर्चा

दरम्यान, सुजय विखेंच्या या वक्तव्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकरी पुत्रांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत एक पत्र पाठवून त्यावर दोन हजार रुपयांचा चेक जोडला आहे. 'आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये पाठवत आहोत. तुम्ही लोणीमध्ये कमळ सोडून अन्य कुणालाही मत द्यावे, असे आवाहन या शेतकरी पुत्रांनी केले आहे. तसंच, ‘दोन हजारांत आपली किंमत करू पाहणारे सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील, ज्यांच्यासाठी सुजय नैतिकता बाजूला ठेवून मतांचा जोगवा मागत आहेत त्या राम शिंदे आणि त्यांच्या पक्षाला अजिबात मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

पुण्यात ‘राज’गर्जना, मनसेच्या प्रचारास होणार प्रारंभ