पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्लास्टिकच्या पिशवीतून पैसे आणल्याने उमेदवाराला ५ हजारांचा दंड

प्लास्टिकच्या पिशवीतून पैसे आणले

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अशामध्ये अहमदनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन येणे एका अपक्ष उमेदवाराला महागात पडले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात ५ हजार रुपयांचा दंड नेवासा नगर पंचायतीने वसूल केला आहे. दंड भरण्यासाठीच पैसे गेल्यामुळे या उमेदवाराला अर्ज न भरता परत जावे लागले. 

 

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का; 200 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराम मुंगसे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सोमवारी ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते १० हजारांची नाणी आणि नोटा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन आले होते. प्लास्टिकचा वापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारावर पहिल्यांदाच अशा प्रकारे कारवाई झाली आहे. 

पावसाळा संपला, राज्यात सरासरीपेक्षा जास्त तर पुण्यात रेकॉर्डब्रेक पाऊस

अनामतसाठी मुंगसे यांनी पैसे प्लास्टिकच्या पिशवीतून आणले असल्याचे निवडणूक अधिकारी शाहूराव मोरे, सहायक निवडणूक अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या लक्षात आले. प्लास्टिकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातली असताना देखील प्लास्टिक पिशवीचा वापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करत समीर शेख यांनी त्यांना ५ हजारांचा दंड ठोठावला. दंड वसुल करताना मुंगसे यांच्याकडून फक्त १ हजार रुपयांची नाणी आणि उर्वरीत ४ हजार रुपयांच्या नोटा घेण्यात आल्या. दंड भरण्यासाठी पैसे गेल्यामुळे मुंगसे यांना अर्ज भरता आला नाही. 

अरूण जेटलींच्या पत्नीने उपराष्ट्रपती, पंतप्रधानांना लिहिले पत्र