पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडणुकीनंतरच्या प्रस्तावित आघाडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला राज्यपालांना हे सरकार स्थापन होण्यापासून रोखण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. ही याचिका महाराष्ट्रातील रहिवासी एस आय सिंह यांनी दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आघाडी करण्यासाठी पुढे आलेल्या या पक्षांनी एक-दुसऱ्यांविरोधात निवडणूक लढवली होती. अशावेळी निवडणुकीनंतर ते आघाडी कशी करु शकतात, असे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीदरम्यानची चर्चेची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. शुक्रवारी शिवसेनेबरोबर चर्चेनंतर या आघाडीवर मोहोर लागू शकते.

यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणी समितीने चर्चेनंतर राज्यात शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास आपली स्वीकृती दिली. पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हणाले की, शुक्रवारपर्यंत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बैठक झाली. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही पक्षात सहमती झाल्याचे सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Against peoples mandate Plea in Supreme Court to stop Shiv Sena NCP alliance in Maharashtra