पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुनगंटीवार म्हणाले, हम साथ साथ है!

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच भाजप-सेना नेत्यांची बैठक पार पडली.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना नेत्यांची बैठक पार पडली. अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतीच्या  नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.  

राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भातील अपडेट्स 

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी बैठकीसंदर्भातील चर्चेबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील ओल्या दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील शेतकऱ्याला हेक्टरी सरसकट २५ हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी. यामध्ये २ हेक्टरची मर्यादा ठेवू नये, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सक्तीची कर्जवसूली करु नये, यासंदर्भात बँकांना सूचना द्याव्यात, या प्रश्न मांडण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या मुद्याकडे सकारात्मकता दाखवली, असे ते म्हणाले.  

आमच्याकडे आकडे नाहीत, कौल महायुतीच्या बाजूनेच - शरद पवार

या बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले की, सत्ता स्थापनेपेक्षा आम्ही राज्यातील बळीराजाच्या समस्येला प्राधान्य देत आहोत. शेतकरी हाच बैठकीचा केंद्रबिंदू होता. अवकाळी पावसाने राज्यातील ३४ जिल्ह्यात जवळपास ७० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. केंद्राकडून मदतीची वाट न पाहता ओआकस्मित निधीतून मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे ते म्हणाले. कोण अडून बसलंय याचे उत्तर तुम्हाला योग्य वेळी मिळले. सेना-भाजप नेत्यांमध्ये आनंदी वातावरणात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत हम साथ साथ है! असेही ते यावेळी म्हणाले.