पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शिवसेनेचा मुख्यमंत्री हीच ती गोड बातमी'

शिवसेना

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असताना भाजपने सत्ता स्थापनेबाबतच्या हालचालींना वेग देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नेते गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.  

सत्तासंघर्ष : मुख्यमंत्र्यांशिवाय भाजप नेते राज्यपालांना भेटणार

राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापनेचा दावा करणार असेल तर ती चांगली गोष्ट आहे. मोठा पक्ष म्हणून भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा. राज्यपालांना त्यांनी १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी दिली तर ती आनंदाची बाब असेल, असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र यावेळी राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल याचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार लवकरच गोड बातमी मिळेल, असे सांगत आहेत. ही गोड बातमी दुसरी काही नसून शिवसेनाचाच मुख्यमंत्री होणार हिच आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.  

आता प्रियांका चतुर्वेदींकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

नाराजी दूर करुन महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर व्यक्त केला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या वक्तव्यातून शिवसेना अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी नवनर्विचित आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका मांडतील. मात्र मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार याचा पुनरउच्चार त्यांनी केला आहे. मुनगंटीवार गेल्या काही दिवसांपासून गोड बातमी लवरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल अस म्हणत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हिच ती गोड बातमी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  

पुन्हा भाजपचे सरकार नको, हुसेन दलवाईंनी घेतली संजय राऊतांची भेट

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर ठाम असून  भाजपने फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच नवे सरकार स्थापन होणार असल्याची भूमिका घेतली आहे. गुरुवारी यासंदर्भात भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. या घडामोडीनंतर राजकीय घडामोडी कोणत्या दिशेला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:after maharashtra vidhansabha election 2019 result bjp forming govt that is good news says shivsena leader sanjay raut