महाराष्ट्रात गेल्या एक महिन्याभरापासून जास्त काळ सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर नवनिर्वचित आमदार विधानसभेत पोहोचले. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी आज विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व आमदारांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या जातीने हजर होत्या. विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून त्या प्रत्येक आमदाराचे स्वागत करत होत्या. याचदरम्यान अजित पवार हेही तिथे पोहोचले. त्यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गळाभेट घेतली.
'आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर सुरक्षित उतरलं'
#WATCH NCP leader Supriya Sule welcomed Ajit Pawar and other newly elected MLAs at #Maharashtra assembly, earlier today. #Mumbai pic.twitter.com/vVyIZfrl1x
— ANI (@ANI) November 27, 2019
मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांची घरवापसी झाली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवारांच्या घरवापसी नंतर अवघ्या ८० तासांच्या आत त्यांना राजीनामाही द्यावा लागला.
मला सध्या काहीही बोलायचं नाही.., अजित पवारांची पहिली
अजित पवार विधानसभेच्या विशेष सत्रात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची गळाभेट घेतली. यावेळी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील हेही उपस्थित होते. पाटील यांनी सु्प्रिया यांचे हात जोडून अभिवादन केले.
महाविकास आघाडीत इतर कोणाला काय मिळणार?
Mumbai: NCP leader Supriya Sule welcomed Ajit Pawar at #Maharashtra assembly, earlier today before the special session of the assembly. pic.twitter.com/ddwUJuC833
— ANI (@ANI) November 27, 2019
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विधानभवनात आले. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांचेही स्वागत केले. दोघांनी हस्तांदोलन करत खिलाडूवृ्त्तीने एकमेकांना आदर दिला.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीचा घेतलेला पाठिंबा लाचारी नव्हती का?,सेनेचा सवाल