पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरेंचा वरळीत मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार

आदित्य ठाकरे

विधानसभा निवडणुकीला अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या मतदारसंघात धाव घेतली. आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात मॉर्निंग वॉकद्वारे प्रचार केला आहे. 

आम्ही ज्यांना नाकारले तेवढेच पवारांसोबत : CM फडणवीस

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. थेट आदित्य ठाकरे यांची भेट झाल्यामुळे अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फि काढण्याचा मोह आवरला नाही. आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी शिवसेनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपने देखील मॉर्निंग वॉक विथ प्रचार केला होता. मुख्यमंत्र्यांनी मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक करत जनतेशी संवाद साधला होता. 

अमिताभ बच्चन तीन दिवसांपासून रुग्णालयात