पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या अणुशक्तीनगरमधील सर्वाधिक उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

प्रातिनिधिक छायाचित्र

विधानसभा निवडणुकीसाठी एकट्या मुंबईतून ३३३ उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहेत. यातल्या ८९ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती देणं आवश्यक असतं, या माहितीच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवार हे अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये आहेत. 

 

१० वर्षांच्या तुलनेत मुंबईत सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

 या उमेदवारांवर खंडणी, खूनाचा प्रयत्न, चोरी,  धमकी देणे असे आरोप आहेत. मतदारांना  त्यांच्या उमेदवारांविषयी माहिती असावी आणि मतदान करताना या माहितीच्या आधारे त्यांनी योग्य तो उमेदवार निवडणून द्यावा असा 'मुंबई वोट' या स्वयंसेवी संस्थेचा प्रयत्न आहे.  अणुशक्तीनगरमधील अकबर हुसैन या अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारावर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे तर दुसऱ्या क्रमांवर  मनसेचे  अखिल चित्रे आणि तिसऱ्या क्रमांकावर एमआयएम पक्षाच्या शाहानवाज सरफराजचा समावेश आहे. 

शरद पवार ट्रेंडिंगमध्ये, अनेकांकडून 'साहेबां'ना सलाम!

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवार या मतदारसंघातले
अणुशक्तीनगर मतदारसंघ-  आठ उमेदवार
चांदीवली मतदार संघ-  सहा उमेदवार
सायन कोळीवाडा मतदार संघ- पाच उमेदवार
घाटकोपर पश्चिम- पाच उमेदवार
धारावी- चार उमेदवार
वरळी- चार उमेदवार