पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या रिंगणात

अभिजित बिचुकले

'कवी मनाचे नेते' म्हणून ओळखले  जाणारे  अभिजीत बिचुकले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात  निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष म्हणून  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये अभिजीत बिचुकले सहभागी झाले  होते. या शोमधील वादग्रस्त वक्तव्य, महिला स्पर्धकाला केलेली शिवीगाळ यामुळे ते चर्चेत आले होते.  

..तर पक्षात दीर्घकाळ राहणार नाही, संजय निरुपमांचा धमकीवजा इशारा

 अभिजीत बिचुकले  चार वेळा उदयनराजे भोसले यांच्याविरोधात साताऱ्यातून लढले होते. आता मुंबईच्या वरळी मतदार संघातून ते अपक्ष  आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवत आहेत. 'बिग बॉस मुळे मला लोकांचं खूप प्रेम मिळालं. माझा टीआरपी वाढला. साताऱ्यातून मी आलो असलो तरी मुंबईसारख्या शहरात माझी कित्येक दिवस चर्चा होती. मुंबईकरांनी  मला प्रेम दिलं म्हणूनच या प्रेमाची परतफेड करण्याठी मी मुंबईतून विधानसभा निवडणूक लढवत आहे', असं बिचुकले हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले. 

'शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत'

'सचिन अहिर यांनी आदित्य  ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ सोडला. लोकशाहित आता राजेशाहीचा दबदबा निर्माण होतोय असं चित्र दिसतंय हेच चित्र बदलण्यासाठी मी वरळी निवडली असं बिचुकले म्हणाले. आदित्य कोट्यधीश आहे आणि मी होतकरू आहे त्यामुळे मुंबईकर कोणाला मत देईल हे कळेलच. मुंबईकर जागरूक झाले की ते नक्कीच त्यांच्यासाठी लढणाऱ्यांना पुढे नेतील', त्यामुळे वरळीतून आपण जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.