पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आदित्य ठाकरे 'कोट्यधीश', जाणून घ्या संपत्ती

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले होते. उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आदित्य ठाकरेंनी आपली एकूण संपत्ती जाहीर केली आहे. आदित्य ठाकरेंनी आपली एकूण संपत्ती ही १६ कोटींहून अधिक असल्याचे म्हटले आहे. 

मनसेला धक्का, नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश

 उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला त्याच्या संपत्तीची माहिती जाहीर करणं हे अनिवार्य असते. संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर २० लाख ४९ हजारांचे  बाँड शेअर, ६४ लाख ६५ हजारांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू, ६ लाख ५० हजारांची कार असल्याचं नमूद केलं आहे. तर ४ .६७ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रकात म्हटलं आहे यात घोडबंदरमध्ये दोन दुकानं आणि खालापूरमध्ये चार प्लॉट असल्याचंही नमूद केलं आहे.

आदित्यला आशीर्वाद देणाऱ्यांचा ऋणी, उद्धव ठाकरेंचे 'मनसे' आभार

आदित्य यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. आदित्य यांच्या निमित्तानं ठाकरे कुटुंबातील पहिलाच सदस्य यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. मात्र मला पदात रस नाही, मी समाजासाठी काम करणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.