पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा उद्याच

उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता महाविकास आघाडीला उद्याच म्हणजे शनिवारी आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. साधारणतः शनिवारी दुपारच्या सुमारास बहुमत चाचणी होईल. तत्पूर्वी, हंगामी विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुमत चाचणी त्यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी पुढील आठवड्यात होईल, असे बोलले जात होते. परंतु, ही चाचणी आता शनिवारी घेण्याचे ठरले आहे. यासाठी शनिवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. विधानसभेत बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीने १६२ च्या पुढे आपल्या आमदारांची संख्या असून हा आकडा १७० पर्यंत जाईल असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या तरी ही बहुमत चाचणी सहज संमत होऊ शकते.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील

सभागृहाचे कामकाज सुरु होईल. त्यानंतर हंगामी अध्यक्षांची निवड होईल. मग नूतन मंत्र्यांची ओळख करुन देण्यात येईल. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर करण्यात येईल.

दरम्यान, विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता दिलीप वळसे पाटील यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A special session of the Maharashtra assembly called for tomorrow for Confidence Resolution