पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोव्यातही राजकीय भूकंप- संजय राऊत

संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर आता गोव्यातीलही सत्ताचित्र पालटणार असंच दिसतंय. महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही राजकीय भूकंप येणार, लवकरच इथेही चमत्कार पाहायला मिळणार असा गौप्यस्फोट करत संजय राऊत यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. गोव्यालाही भाजपमुक्त करायचं आहे, असं राऊतांनी सांगितलं. सध्या गोव्यात  भाजपाचं सरकार असून प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला नाहीतर काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं होतं.

'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्या'

'गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह तीन आमदार आमच्या संपर्कात आहेत. गोव्यात नवी आघाडी निर्माण होत आहे, जशी ती महाराष्ट्रात झाली. लवकरच गोव्यातही असाच चमत्कार पाहायला मिळले',  असं ते एएनआयला दिलेल्या प्रतिकियेत म्हणाले.

'हे देशभरात होईल. महाराष्ट्र आणि गोव्यानंतर आम्ही इतर राज्यातही जाऊ. आम्ही भाजपविरोधात नवी आघाडी तयार करू', असंही राऊत म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांचा नव्या घरासाठी शोध सुरु

गोव्यात ज्या प्रकारे सरकार निर्माण केलं आहे ते सर्वांना माहिती असून हे आमच्यावर टीका करतात, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला आहे.

हे नातं असंच राहू दे, फडणवीसांचे राऊतांनी मानले आभार