पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात ७९८ उमेदवारांना धक्का; उमेदवारी अर्ज झाले नामंजुर

निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांना धक्का बसला आहे. राज्यभर उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली. यामध्ये ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजुर करण्यात आले आहेत. निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या उमेदवारांच्या अर्जामध्ये अनेक त्रुटी आढळल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. 

पीएमसी बँक घोटाळा: एचडीआयएलच्या संचालकांचे खासगी जेट आणि कार जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरामध्ये ५ हजार ५४३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामधील जवळपास ४ हजार ७३९ अर्ज वैध ठरवण्यात आले. उर्वरीत म्हणजे ७९८ उमेदवारांच्या उमेदवारी अर्जात काही त्रुटी आढळल्यामुळे ते अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांना धक्का बसला आहे. 

कोयना आणि प्रगती एक्स्प्रेस १० दिवसांसाठी रद्द

पुण्यामधील ७१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. नागपूरमध्ये २८ उमेदवार, औरंगाबादमध्ये ४ उमेदवार, सोलापूरमध्ये १३७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील आणि अर्जुन खोतकर यांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यातील पर्वती येथे गाड्यांना आग; ७ गाड्या जळून खाक