पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या ३६ जागांसाठी ३३३ उमेदवार रिंगणात

प्रातिनिधिक छायाचित्र

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपली. एकट्या मुंबईत ३६ जागांसाठी तब्बल ३३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ३३३ उमेदवारांपैकी २४४ उमेदवार हे उपनगरातील जागांसाठी निवडणूक लढवत आहेत तर ८९ उमेदवार हे शहरातील १० जागांवर आपलं नशीब आजमावणार आहेत.

ठाण्यात राष्ट्रवादीचा मनसेला पाठिंबा ?

'प्रत्येक मतदार संघात जवळपास १५ किंवा त्याहून कमी उमेदवार निवडणूक लढवत आहेत. इव्हीएम मशीनमध्ये १५ जणांसाठी जागा आहेत, १६ वी जागा ही नोटासाठी राखीव असते. त्यामुळे अतिरिक्त इव्हीएम मशीनची तूर्त गरज नाही. बोरिवली आणि वांद्रे पश्चिममध्ये चार उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत आहेत. सर्वाधिक उमेदवार  हे चांदिवली आणि अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. इथे प्रत्येकी १५ उमेदवार आहेत' अशी माहिती कलेक्टर मिलिंद बोरीकर यांनी दिली. 

उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानावर प्रकाश जावडेकर म्हणाले...

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी  शेवटची मुदत होती. यावेळी उपनगरातून ३२, शहरातून ५ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या निवडणुकीत पश्चिम आणि पूर्व उपनगरात ७२ लाख २६ हजार ८२६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.