पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: रयतेच्या स्वप्नपूर्तीचं धनुष्य पेलण्याची कसोटी

उद्धव ठाकरे

सत्तासंघर्षाच्या रणधुमाळीत भाजपच्या एका बड्या नेत्याने क्रिकेट आणि राजकारणामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते असे विधान केले होते. क्रिकेटच्या मैदानातील रंगतदार सामन्यात नो बॉल पडावा आणि फलंदाजाला मोक्याच्या क्षणी फ्री हिट मिळावी अशी परिस्थिती अखंड महारष्ट्राने पाहिली. देवेंद्र फडणवीसांनी फ्री हिटवर विजयी धाव घेण्याचा प्रयत्नही केला पण नॉनस्ट्राइकला असलेल्या अजित दादांनी धाव घ्यायला नकार दिल्यानंतर फडणवीसांना धावबाद व्हावे लागले. कधीकाळी केवळ बीसीसीआयचेच नव्हे तर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या  शरद पवारांनी फिक्स झालेला सामना त्यांच्यापद्धतीने फिक्स केला. आता पुढची रिस्क आहे ती उद्धवजी ठाकरेंवर....

BLOG: फडणवीसजी विक पॉइंट शोधला, पण स्ट्रोकपूर्वी ही चूक केलीत

हिंदू ह्रदय सम्राट आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्याचा उद्धवजींनी उचललेला विडा अनेक तिढ्यानंतर सफल झालाय. या सत्तासंघर्षात कमावलं काय आणि गमावलं काय हा विचार करण्याचा हा प्रसंग नाही, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनीच म्हटले आहे. राज्यातील रयतेच्या अनेक समस्या सोडवताना अवकाळी पावसामुळे हताश झालेल्या बळीराजाला बळ देण्याचं मोठ आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मित्रापेक्षा शत्रू बरा अशी भावना त्यांच्या मनात असली तरी मित्र आता शत्रू झालाय यात गाफिल राहून चालणार नाही. मातोश्रीवरुन आदेश सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आदेश पारित करुन घ्यायचे कसब दाखवून द्यावे लागेल.

आदित्य ठाकरेंच्या रुपात ठाकरे घराण्यातील पहिला आमदार आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. पदार्पणाच्या सामन्यात किती सामने खेळणार याचा तर्कवितर्क लढवणे वेडेपणाचे ठरेल. त्यामुळे अभूतपर्व सरकार किती काळ टिकेल, यावर भाष्य करणार नाही. पण ज्या सहकार्यांसोबत ते आपल्या राज्याचा गाडा चालवत असताना अनेक तह देखील त्यांना करावे लागतील. भाजपला दिलेला वेढा यशस्वी ठरवण्यासाठी हाच त्यांच्यासमोर पर्याय असेल. रणांगणात अनुभवी योद्धासोबत असेल तर नवख्या लढवय्यावर शरणागती पत्करण्याची वेळ येत नाही. पण त्यासाठी दोघांमधील समजूतदारपणाची बाजू अत्यंत महत्वपूर्ण ठरते. मुख्यमंत्रिपदी असताना ते ही जबाबदारी कशी पेलणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे असेल. 

BLOG : मी विरोधी होणार अर्थात सत्तेचा त्रिकोण

विदर्भकराशी (माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांच्याशी पंगा घेतल्यानंर अखंड महाराष्ट्राचा प्रंचड व्याप्ती असलेल्या कॅनव्हास परफेक्ट फ्रेममध्ये बसवून  सरकारसह मुख्यमंत्री म्हणून आपली छाप रयतेसमोर पाडण्याची कसरत त्यांना करायची आहे. उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीत शिवसेना एका मुद्यावर ठाम न राहता बदलाच्या दिशेने प्रवाह करताना पाहायला मिळाले. सत्तेत असून मित्रपक्षांना विरोध करत आम्ही खटकणाऱ्या गोष्टी कदापी सहन करत नाही, असा पवित्रा त्यांनी अनेकवेळा घेतल्याचेही पाहायला मिळाले. ३० वर्षे हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबतची युती तोडून त्यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचे मोठे धाडस दाखवले आहे.  टोकाचे मतभेद बाजूला ठेवून राज्य यशस्वीरित्या चालवून महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय रचण्याची संधी  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आहे. ते हे शिवधनुष्य कसे पेलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जय महाराष्ट्र!
- सुशांत जाधव

Sushantjournalist23@gmail.com  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Uddhav Thackerays Sarkar own challenges to face as maharashtra cm in Maharashtra Vikas Aghadi govrnment special blog