logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : जयंत पाटील यांना सीएम करण्याचे शरद पवारांचे संकेत, अजित पवार काय म्हणाले?

video : जयंत पाटील यांना सीएम करण्याचे शरद पवारांचे संकेत, अजित पवार काय म्हणाले?

Published Oct 30, 2024 05:18 PM IST

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २९ ऑक्टोबर रोजी अनेक उमेदवारांनी अर्ज भरले. सांगलीतील इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निशिकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी झालेल्या सभेत अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. जयंत पाटील यांना भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, असं शरद पवार एका सभेत म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत अजित पवारांनी शरद पवारांना टोला हाणला. हे लबाडाघरचं आवताण आहे. जास्त आमदार असताना आमचा मुख्यमंत्री होऊ दिला नाही, तर आता काय करणार, असं अजित पवार म्हणाले.