logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : ती तसली आहेत, आम्ही तसले नाही! बारामतीच्या सभेत काय म्हणाले अजित पवार?

Video : ती तसली आहेत, आम्ही तसले नाही! बारामतीच्या सभेत काय म्हणाले अजित पवार?

Oct 29, 2024, 05:39 PMIST

Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाकडं देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी अजितदादांना आव्हान दिलं आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सोमवारी अजित पवार यांनी जाहीर सभा घेतली. बारामतीच्या विकासासाठी जे-जे केलं त्या सगळ्याचा पाढा अजित पवार यांनी यावेळी वाचला. बारामतीसारखा मतदारसंघ आम्हाला हवा आहे असे दाखले इतर लोक देत असतात. याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. मला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या, मी बारामतीला प्रचंड निधी मिळवून देईन, असा शब्द अजित पवार यांनी दिला.