logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याशी गद्दारी केली! सुप्रिया सुळे का संतापल्या?

Video : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याशी गद्दारी केली! सुप्रिया सुळे का संतापल्या?

Nov 01, 2024, 05:00 PMIST

Maharashtra Assembly Elections 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला. माझ्या विरोधात त्यांनीच चौकशी लावली. त्या फाइलवर सही आर आर पाटील यांची होती. फडणवीसांनी मला ती फाइल दाखवली, असं अजित पवार एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांवर सर्वात आधी आरोप करणारे देवेंद्र फडणवीस हेच होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच अजित पवारांच्या चौकशीच्या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर त्याच अजित पवारांना सोबत घेतलं. त्यानं सहीची फाईल दाखवली. गोपनीयतेचा भंग केला. सरळ सरळ राज्याशी गद्दारी केली, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.