भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
Copyright © HT Media Limited All rights reserved.
Nov 04, 2024, 06:02 PMIST
Supriya Sule Kagal Speech : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघात समरजित घाटगे पाटील यांच्यासाठी आज सुप्रिया सुळे यांची सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर जोरदार उत्तर दिलं. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेय असं काही लोक म्हणतात. होय, मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेय, पण तो चमचा ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सपासून वाचवलेला नाही. तो माझ्या आजी-आजोबांच्या कष्टाचा चमचा आहे. मी लाडात वाढले यात चुकीचं काय आहे? प्रत्येक मुलगी आपल्या आई-बाबांसाठी लाडकी असते. मुलगीच काय मुलगाही असतो. त्यामुळं ते माझं भाग्यच आहे. पण एक खासदारकी सोडली तर एवढ्या वर्षात मी पक्षाकडं कधीच काही मागितलेलं नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.