logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : बारामतीत अजित पवारांविरुद्ध लढणाऱ्या नातवाला आजोबांनी काय दिला सल्ला?

Video : बारामतीत अजित पवारांविरुद्ध लढणाऱ्या नातवाला आजोबांनी काय दिला सल्ला?

Oct 28, 2024, 04:15 PMIST

Baramati Assembly Elections 2024 : बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी अर्ज भरला. पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे यावेळी स्वत: उपस्थित होते. तब्बल ५७ वर्षांपासून लोक सातत्यानं माझ्यावर विश्वास टाकत आहेत. इतकी वर्षे लोकांनी पुन्हा-पुन्हा निवडून देणं ही मोठी गोष्ट आहे. जनतेशी बांधिलकी हे त्यामागचं कारण आहे. नव्या पिढीनं जनतेशी बांधिलकी ठेवावी. नम्र राहावं, असा सल्ला त्यांनी युगेंद्र पवार यांच्यासह तरुण राजकारण्यांना दिला. युगेंद्र पवार यांची लढत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होणार आहे.