logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: सोनाली कुलकर्णीने पाहिला पहिला मराठी सुपरहिरो चित्रपट! भरभरून केलं कौतुक

Video: सोनाली कुलकर्णीने पाहिला पहिला मराठी सुपरहिरो चित्रपट! भरभरून केलं कौतुक

Published May 24, 2024 12:57 PM IST

Sonalee Kulkarni on Shaktiman Movie: आपल्या प्रत्येकाला बालपणी सुपरहिरो आवडत असतात. त्यांच्या अलौकिक शक्ती, त्यांचा धाडस, त्यांची चपळता आपल्याला भुरळ घालते. पण खऱ्या आयुष्यातला सुपरहिरो कसा असतो? कोण असतो? खऱ्या आयुष्यातला सुपरहिरो हा कोणत्याही अलौकिक शक्तींचा स्वामी नसतो, तो फक्त एक सामान्य आल्यासारखा माणूस असतो. पण त्यात वेगळं असतं ते त्याचं प्रेम, त्याची जिद्द आणि त्याचं समर्पण आणि हेच त्याला एक खरा सुपरहिरो बनवतं. असचं काहीसं कथानक असलेला पहिला मराठी सुपरहिरो चित्रपट ‘शक्तिमान’ हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने पाहिला आणि त्याचे भरभरून कौतुक केले.