सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा यानिक सिनर कोण आहे? ३ ग्रँड स्लॅम पटकावणारा पहिलाच इटालियन
Published Jan 26, 2025 08:25 PM IST
- Who is Jannik Sinner : इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याला सरळ सेटमध्ये पराभूत करून जेतेपद पटकावले २३ वर्षीय सिनरने २ तास ४२ मिनिटे चाललेला हा सामना ६-३, ७-६ (४), ६-३ असा जिंकला.
Who is Jannik Sinner : इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याला सरळ सेटमध्ये पराभूत करून जेतेपद पटकावले २३ वर्षीय सिनरने २ तास ४२ मिनिटे चाललेला हा सामना ६-३, ७-६ (४), ६-३ असा जिंकला.
- Who is Jannik Sinner : इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याला सरळ सेटमध्ये पराभूत करून जेतेपद पटकावले २३ वर्षीय सिनरने २ तास ४२ मिनिटे चाललेला हा सामना ६-३, ७-६ (४), ६-३ असा जिंकला.
Australia Open 2025 Final : इटलीच्या यानिक सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन ओपनची पुरुष गटातील फायनल जगातील नंबर वन खेळाडू यानिक सिनर आणि जागतिक नंबर दोन खेळाडू जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात खेळला गेला. यामध्ये यानिक सिनरने बाजी मारली.
यासह तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा यानिक सिनर हा पहिला इटालियन खेळाडू ठरला.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सिनर याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. पण याचा त्याच्या खेळावर कोणताही परिणाम दिसला नाही. उलट त्याला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावण्यात यश आले.
यानिक सिन्नरने एकतर्फी फायनल जिंकली
या सामन्यात यानिक सिनरने अलेक्झांडर झ्वेरेव्हला पराभवाचा धक्का दिला. यानिक सिन्नरने हा सामना ६-३, ७-६ (४), ६-३ असा सरळ सेटमध्ये जिंकला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना २ तास ४२ मिनिटे चालला.
यानिक सिनरने गेल्या १३ महिन्यांतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. याआधी त्याने यूएस ओपन २०२४ आणि ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ जिंकले होते. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम विजेतेपदाला मुकला.
अलेक्झांडर झ्वेरेव तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पराभूत
अलेक्झांडर झ्वेरेव २०१५ पासून ग्रँड स्लॅम खेळत आहे, यादरम्यान तो ३ वेळा फायनलमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला. मात्र प्रत्येक वेळी त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी झ्वेरेवला अंतिम फेरी गाठण्यासाठी जास्त त्रास सहन करावा लागला नाही.
उपांत्य फेरीत त्याला नोव्हाक जोकोविचच्या आव्हानाला सामोरे जावे लागले पण २४ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्याने पायाच्या दुखापतीमुळे एका सेटनंतर सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत त्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.
यानिक सिनरच्या नावावर झाले हे दोन विक्रम
ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासात यानिक सिनर हा केवळ ११ वा खेळाडू ठरला आहे, ज्याने आपले विजेतेपद डिफेंड केले आहे. दुसरीकडे, सलग दोनदा हे विजेतेपद पटकावणारा तो जिम कुरियर (१९९२ आणि १९९३) नंतरचा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.
यानिक सिनर कोण आहे?
यानिक सिनर वयाच्या तिसऱ्या वर्षापासून एक प्रतिभावान स्कीअर होता. वयाच्या आठव्या वर्षी, त्याने जायंट स्लॅलममध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आणि वयाच्या १२ व्या वर्षी तो राष्ट्रीय उपविजेता ठरला.
यानंतर वयाच्या १३ व्या वर्षापासून सिनरने आपले लक्ष टेनिसकडे वळवले आणि अनुभवी प्रशिक्षक रिकार्डो पियाट्टी यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी बोर्डिघेरा येथे गेला.
टेनिसचा प्रतिभावान खेळाडू यानिक सिन्नरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी व्यावसायिक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने अनेक एटीपी चॅलेंजर टूर विजेतेपदे जिंकली होती.
२०१९ मध्ये, तो जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये पोहोचला आणि नेक्स्ट जनरेशन एटीपी फायनल्स तसेच एटीपी न्यूकमर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला.