शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी; कुस्ती खेळता येणार नाही, पंचांना मारहाण करणं भोवलं
Published Feb 03, 2025 09:29 AM IST
- Mahendra Gaikwad Shivraj Rakshe Ban : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. या दोन्ही पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांशी वाद घातला होता.
Mahendra Gaikwad Shivraj Rakshe Ban : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. या दोन्ही पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांशी वाद घातला होता.
- Mahendra Gaikwad Shivraj Rakshe Ban : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. या दोन्ही पैलवानांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांशी वाद घातला होता.
Mahendra Gaikwad Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी २०२५ मध्ये पंचांना मारहाण करणे पैलवान शिवराज राक्षे याला चांगलेच महागात पडले आहे. त्याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. सोबतच पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. महेंद्र गायकवाड यानेही महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचांशी हुज्जत घातली होती. या दोन्ही पैलवानांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.
कुस्तीगीर परिषदेच्या या निर्णयामुळे दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली.
शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
मॅट विभागात महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. सामन्याच्या एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य झाला नाही. यानंतर त्याने पंचांशी वाद घालायला सुरुवात केली. राक्षे याने पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारली. यानंतर जवळपास अर्धा तास हा गोंधळ सुरू होता.
महेंद्र गायकवाडवर पंचांना शिवागाळ केल्या आरोप
यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यातही नाराजीनाट्य घडले. पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला दुसरा गुण दिल्याने महेंद्र गायकवाड याने नाराजी व्यक्त केली आणि मैदान सोडलं. यावेळी गायकवाड याने आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप पंचांनी केली.
महेंद्र गायकवाड याने मैदान सोडताच त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. शेवटी पृथ्वीराज मोहोळ याला विजेता घोषित करण्यात आले. मोहोळच्या या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते चांदीची गदा देऊन त्याचा सन्मान केला. तसेच त्याला थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.