Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा! पैलवान शिवराज राक्षे याची पंचांना मारहाण
Published Feb 02, 2025 07:49 PM IST
- Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामना मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षेने आक्षेप घेत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.
Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामना मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षेने आक्षेप घेत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.
- Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामना मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षेने आक्षेप घेत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेत मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली.
महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेची गादी विभागातील फायनल नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. हा सामना पृथ्वीराज मोहोळ याने जिंकला. पण शिवराज राक्षे याला हा पराभव मान्य नव्हता.
अशा स्थितीत राक्षे याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. यानंतर संतापाच्या भरात त्याने पंचांची कॉलर पडकली आणि लाथ मारली, हा संपूर्ण घटनाक्रम उपस्थितांनी पाहिला. तसेच, कॅमेऱ्यातही कैद झाला.
या सर्व प्रकारानंतर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या समोर राडा
उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र केसरीची फायनल पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच शिवराज राक्षे याने हा राडा घातला. अंतिम लढतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास मानाच्या चांदीची गदा देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या कुस्तीगीरास बोलेरो गाडी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ.संतोष भुजबळ यांनी दिली.
शिवराज राक्षे कोण आहे?
पैलवान शिवराज राक्षे हा मुळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा आहे. त्याला कुस्तीचे बाळकडून घरातूनच मिळाले. त्याचे वडील आणि आजोबा पैलवान होते. त्यांचाच वारसा शिवराज राक्षे पुढे चालवत आहे.