logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  नवरा नाही कसाई, श्वास कोंडेपर्यंत मारायचा! दीपक हुडावर अर्जुन पुरस्कार विजेत्या पत्नीचा गंभीर आरोप

नवरा नाही कसाई, श्वास कोंडेपर्यंत मारायचा! दीपक हुडावर अर्जुन पुरस्कार विजेत्या पत्नीचा गंभीर आरोप

Updated Feb 27, 2025 08:01 PM IST

google News
  • Sweety boora FIR on Deepak Hooda : भारतीय कबड्डीचा स्टार खेळाडू दीपक हुडा विरोधात त्याची पत्नी स्वीटी बुरा हिने एफआयआर दाखल केला आहे. स्वीटीने हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

नवरा नाही कसाई, श्वास कोंडेपर्यंत मारायचा! दीपक हुडावर अर्जुन पुरस्कार विजेत्या पत्नीचा गंभीर आरोप

Sweety boora FIR on Deepak Hooda : भारतीय कबड्डीचा स्टार खेळाडू दीपक हुडा विरोधात त्याची पत्नी स्वीटी बुरा हिने एफआयआर दाखल केला आहे. स्वीटीने हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

  • Sweety boora FIR on Deepak Hooda : भारतीय कबड्डीचा स्टार खेळाडू दीपक हुडा विरोधात त्याची पत्नी स्वीटी बुरा हिने एफआयआर दाखल केला आहे. स्वीटीने हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू दीपक हुड्डा याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याची पत्नी स्वीटी बुरा हिने दीपकवर गंभीर आरोप केले आहेत. हुडाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक मिळवले आहे. तर त्याची पत्नी स्वीटी बुरा हिला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ती बॉक्सिंगमध्ये विश्वविजेती राहिली आहे.

आता स्वीटीने हुड्डा आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. २९२२ मध्ये दोघांचे लग्न झाले होते.

स्वीटीने हरियाणातील हिसारमध्ये हुड्डाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तर महिला पोलिस ठाण्याच्या एसएचओ यांनी गुरुवारी सांगितले की, “स्वीटी बुरा हिने तिचा पती दीपक हुड्डा विरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या आधारे, २५ फेब्रुवारी रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.”

दीपक हुड्डाविरुद्ध कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल

जेव्हा एखाद्या महिलेचा पती आणि नातेवाईकांकडून छळ केला जातो तेव्हा त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ८५ नुसार गुन्हा दाखल केला जातो. स्वीटीने हुडावर आलिशान कारची मागणी केल्याचा आरोप केला.

त्यांची मागणी पूर्ण होत असतानाही तो स्वीटीला मारहाण करायचा. तसेच पैशांची मागणी केली. हुड्डा याला भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याने भारतीय संघासोबत दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. याशिवाय, तो भारतातील सर्वात प्रसिद्ध प्रो कबड्डी लीगचा देखील भाग आहे.