logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Novak Djokovic : जोकोविचनं सेमी फायनल अर्ध्यातच सोडली, अलेक्झांडर झ्वेरेव्ह ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

Novak Djokovic : जोकोविचनं सेमी फायनल अर्ध्यातच सोडली, अलेक्झांडर झ्वेरेव्ह ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

Published Jan 24, 2025 11:13 AM IST

google News
    • Novak Djokovic's : नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर झाला आहे. सर्बियाच्या या स्टार टेनिसपटूने दुखापतीमुळे उपांत्य फेरीचा सामना मध्यंतरी सोडला.
Novak Djokovic : नोव्हाक जोकोविचनं सेमी फायनलचा सामना अर्ध्यातच सोडला, अलेक्झांडर झ्वेरेव्ह फायनलमध्ये (AFP)

Novak Djokovic's : नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर झाला आहे. सर्बियाच्या या स्टार टेनिसपटूने दुखापतीमुळे उपांत्य फेरीचा सामना मध्यंतरी सोडला.

    • Novak Djokovic's : नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर झाला आहे. सर्बियाच्या या स्टार टेनिसपटूने दुखापतीमुळे उपांत्य फेरीचा सामना मध्यंतरी सोडला.

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ मधून बाहेर पडला आहे. जोकोविचने दुखापतीमुळे अलेक्झांडर झ्वेरेव्ह (जर्मनी) विरुद्धचा उपांत्य सामना अर्ध्यावर सोडला.

झ्वेरेव्हने पहिला सेट ७-६ (५) असा जिंकला, त्यानंतर जोकोविचने सामन्यातून माघार घेतली. यामुळे जर्मन खेळाडूला वॉकओव्हर मिळाला. यानंतर आता अंतिम फेरीत झ्वेरेव याचा सामना यानिक सिनर (इटली) आणि बेन शेल्टन (यूएसए) यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

२५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले

जोकोविच आणि माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्गारेट कोर्ट सर्वाधिक एकेरीत ग्रँड स्लॅम विजेतेपदे (महिला आणि पुरुष) जिंकण्याच्या बाबतीत बरोबरीत आहेत. या दोघांनी एकेरीचे २४ ग्रँडस्लॅम एकेरी जेतेपदे जिंकली आहेत.

मात्र, मार्गारेटने यातील १३ जेतेपदे ही ओपन एरापूर्वी जिंकली होती. टेनिसमधील खुल्या युगाची सुरुवात १९६८ मध्ये झाली. ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ जिंकून पुढे जाण्याचे जोकोविचचे स्वप्न होते, परंतु त्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.

सर्वाधिक ग्रँडस्लॅम (महिला आणि पुरुष एकेरी)

१) नोव्हाक जोकोविच (पुरुष-सर्बिया) – २४ (ऑस्ट्रेलियन-१०, फ्रेंच-३, विम्बल्डन-७, यूएस-४).

२) मार्गारेट कोर्ट (महिला-ऑस्ट्रेलिया)- २४ (ऑस्ट्रेलियन-११, फ्रेंच-५, विम्बल्डन-३, यूएस-५).

३) सेरेना विल्यम्स (महिला-यूएस) – २३ (ऑस्ट्रेलियन-७, फ्रेंच-३, विम्बल्डन-७, यूएस-६).

४) राफेल नदाल (पुरुष- स्पेन) – २२ (ऑस्ट्रेलियन-२, फ्रेंच-१४, विम्बल्डन-२, यूएस-४)

५) स्टेफी ग्राफ (महिला-जर्मनी) – २२ (ऑस्ट्रेलियन-४, फ्रेंच-६, विम्बल्डन-७, यूएस-५).

६. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – २० (ऑस्ट्रेलियन-६, फ्रेंच-१, विम्बल्डन-८, यूएस-५)

सर्वाधिक ग्रँड स्लॅम फायनल (पुरुष एकेरी)

३७ - नोव्हाक जोकोविच

३१ - रॉजर फेडरर

३०- राफेल नदाल

१९- इव्हान लेंडल

१८- पीट सॅम्प्रस