Vijaya Ekadashi: विजया एकादशीला करा हे उपाय, भगवान विष्णू होतील प्रसन्न
Updated Feb 18, 2025 11:02 PM IST
- Vijaya Ekadashi: दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी विजया एकादशी म्हणून साजरी केली जाते. विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनात सुख-समृद्धीही वाढते.
Vijaya Ekadashi: दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी विजया एकादशी म्हणून साजरी केली जाते. विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनात सुख-समृद्धीही वाढते.
- Vijaya Ekadashi: दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी विजया एकादशी म्हणून साजरी केली जाते. विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनात सुख-समृद्धीही वाढते.
Vijaya Ekadashi २०२५: विजया एकादशीचे व्रत भगवान श्री हरि विष्णू यांना समर्पित आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी विजया एकादशी साजरी केली जाते. फेब्रुवारी महिन्यात सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी विजया एकदशी आहे. या दिवशी पूर्ण भक्तीभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे. विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. त्या बरोबरच जीवनात सुख-समृद्धी देखील वाढते.
भगवान हरि विष्णूला पंचामृताने अभिषेक करावा
विजया एकादशीच्या दिवशी भगवान हरि विष्णूला पंचामृताने अभिषेक करणे उत्तम असते. असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखविण्याच्या नवीन संधीही उपलब्ध होतील.
विजया एकादशीच्या दिवशी करा माता तुळशीची पूजा
जर तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असेल आणि दिवसेंदिवस क्लेश होत असतील तर विजया एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करा. या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला श्रृंगार साहित्य अर्पण करावे.
दान करण्याचे विशेष महत्त्व
विजया एकादशीला दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी गरीब किंवा गरजूंना अन्न अर्पण करा.
श्रीमद्भागवत कथेचे पठण
विजया एकादशीला श्रीमद्भागवत कथेचे भक्तीभावाने पठण करावे. असे केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.
ब्रह्म मुहूर्तात भगवान विष्णूची भक्तीभावाने पूजा करा
जर तुम्ही आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल तर विजया एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तात भगवान विष्णूची पूर्ण भक्तीभावाने पूजा करावी आणि एका पानात ॐ विष्णूवे नम: लिहून देवाच्या चरणी ते अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळावे आणि ते तुमच्या घरातील तिजोरीत ठेवून द्यावे.
पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा
विजया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर झाडाची परिक्रमा करा. असे केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या बरोबरच असे करणाऱ्या व्यक्तीच्या घरातील दारिद्र्य दूर होते अशी धार्मिक मान्यता आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
विभाग