logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2025: कोणत्या संघाला मिळणार प्लेऑफचे तिकीट अन् कोणत्या संघावर स्पर्धेबाहेर होण्याचा धोका? जाणून संपूर्ण समीकरण

IPL 2025: कोणत्या संघाला मिळणार प्लेऑफचे तिकीट अन् कोणत्या संघावर स्पर्धेबाहेर होण्याचा धोका? जाणून संपूर्ण समीकरण

Updated Apr 25, 2025 06:24 PM IST

आयपीएल २०२५ मध्ये सर्व संघ जवळपास ८-८ सामने खेळले आहेत मात्र प्लेऑफमध्ये कोणत्याही संघाने आपली पात्रता सिद्ध केलेली नाही. हळूहळू स्पर्धेचे चित्र स्पष्ट होत आहे. पाहूया प्लेऑफचे संपूर्ण गणित. कोणत्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी काय करावे लागेल, पोहोचण्याची शक्यता किती आहे?

आयपीएल २०२५ मध्ये सर्व संघ जवळपास ८-८ सामने खेळले आहेत मात्र प्लेऑफमध्ये कोणत्याही संघाने आपली पात्रता सिद्ध केलेली नाही. हळूहळू स्पर्धेचे चित्र स्पष्ट होत आहे. पाहूया प्लेऑफचे संपूर्ण गणित. कोणत्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी काय करावे लागेल, पोहोचण्याची शक्यता किती आहे?
चेन्नई सुपर किंग्स - पाच वेळेचे आयपीएल चँपियन चेन्नई सुपर किंग्सचे IPL २०२५ मधील प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे.  यंदाच्या सीझनमध्ये त्यांना ८ सामन्यात केवळ २ मध्येच विजय मिळवता आला असून पॉइंट टेबलमध्ये हा संघ शेवटच्या स्थानी फेकला गेला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचल्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आपले राहिलेले सर्व ६ सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. शुक्रवारी सीएसके आणि हैदराबाद संघात सामना होणार आहे. यामध्ये सीएसकेचा पराभव झाल्यास त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद होतील.
(1 / 10)
चेन्नई सुपर किंग्स - पाच वेळेचे आयपीएल चँपियन चेन्नई सुपर किंग्सचे IPL २०२५ मधील प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. यंदाच्या सीझनमध्ये त्यांना ८ सामन्यात केवळ २ मध्येच विजय मिळवता आला असून पॉइंट टेबलमध्ये हा संघ शेवटच्या स्थानी फेकला गेला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचल्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी त्यांना आपले राहिलेले सर्व ६ सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. शुक्रवारी सीएसके आणि हैदराबाद संघात सामना होणार आहे. यामध्ये सीएसकेचा पराभव झाल्यास त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद होतील.(AFP)
सनरायजर्स हैदराबाद -शुक्रवारी सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात जो संघ हारेल तो संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर होईल. एसआरएचने आतापर्यंत ८ सामन्यात केवळ २ विजय मिळवले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. त्यांना चेन्नई व त्यानंतर पुढच्या ५ सामन्यात विजय मिळवावा लागेल.
(2 / 10)
सनरायजर्स हैदराबाद -शुक्रवारी सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात जो संघ हारेल तो संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर होईल. एसआरएचने आतापर्यंत ८ सामन्यात केवळ २ विजय मिळवले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. त्यांना चेन्नई व त्यानंतर पुढच्या ५ सामन्यात विजय मिळवावा लागेल.(Surjeet Yadav)
गुजरात टायटन्स - गुजरात टायटन्स प्लेऑफचा तगडा दावेदार आहे. टीम सध्या ८ सामन्यात १२ अंक मिळवून आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. साखळी फेरीत अजून त्यांना ६ सामने खेळायचे आहेत. त्यापैकी केवळ २ सामने जिंकले तरी ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील.
(3 / 10)
गुजरात टायटन्स - गुजरात टायटन्स प्लेऑफचा तगडा दावेदार आहे. टीम सध्या ८ सामन्यात १२ अंक मिळवून आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहे. साखळी फेरीत अजून त्यांना ६ सामने खेळायचे आहेत. त्यापैकी केवळ २ सामने जिंकले तरी ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील. (HT_PRINT)
रॉयल चैलेंजर्स बेंगळूरू - आरसीबीने ९ सामन्यात १२ गुण मिळवले असून हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवरती आहे. साखळी सामन्यात त्यांना अजून ५ सामने खेळायचे आहेत. जर बेंगळुरूने २ सामने जिंकले तरी ते प्लेऑफमध्ये जाऊ शकतील. ३ विजय मिळवल्यास त्यांचे स्थान पक्के होईल.
(4 / 10)
रॉयल चैलेंजर्स बेंगळूरू - आरसीबीने ९ सामन्यात १२ गुण मिळवले असून हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवरती आहे. साखळी सामन्यात त्यांना अजून ५ सामने खेळायचे आहेत. जर बेंगळुरूने २ सामने जिंकले तरी ते प्लेऑफमध्ये जाऊ शकतील. ३ विजय मिळवल्यास त्यांचे स्थान पक्के होईल.(PTI)
दिल्ली कॅपिटल्स - दिल्ली कॅपिटल्सने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह टीम नेट रनरेटच्या आधारावर पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीला साखळी फेरीत आणणी सहा सामने खेळायचे आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्य़ासाठी त्यांना आणखी २ विजयाची गरज आहे.
(5 / 10)
दिल्ली कॅपिटल्स - दिल्ली कॅपिटल्सने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह टीम नेट रनरेटच्या आधारावर पॉइंट्स टेबल मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीला साखळी फेरीत आणणी सहा सामने खेळायचे आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्य़ासाठी त्यांना आणखी २ विजयाची गरज आहे.(AFP)
मुंबई इंडियंस - अडखळत सुरुवातीनंतर ५ वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईने लय पकडली आहे. सलद ४ विजयासह संघाने १० गुण मिळवून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत तर ४ गमावले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी साखळी फेरीतील शिल्लक ५ सामन्यांपैकी कमीत कमी ३ सामन्यात विजय मिळवावे लागतील.
(6 / 10)
मुंबई इंडियंस - अडखळत सुरुवातीनंतर ५ वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईने लय पकडली आहे. सलद ४ विजयासह संघाने १० गुण मिळवून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत तर ४ गमावले आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी साखळी फेरीतील शिल्लक ५ सामन्यांपैकी कमीत कमी ३ सामन्यात विजय मिळवावे लागतील.(AP)
पंजाब किंग्स -पंजाब किंग्सने ८ सामन्यात ५ विजय मिळवले आहेत. पंजाब १० गुणांसह आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहेत. साखळी फेरीत त्यांचे अजून ६ सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला यापैकी कमीत कमी त्यांना ३ सामन्यात विजय मिळवावा लागेल.
(7 / 10)
पंजाब किंग्स -पंजाब किंग्सने ८ सामन्यात ५ विजय मिळवले आहेत. पंजाब १० गुणांसह आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहेत. साखळी फेरीत त्यांचे अजून ६ सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाबला यापैकी कमीत कमी त्यांना ३ सामन्यात विजय मिळवावा लागेल. (PTI)
लखनौ सुपर जॉयंट्स -लखनऊ सुपर जॉयंट्सचे ९ सामन्यात ५ विजयासाह १० अंक आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी असलेल्या लखनऊला प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी शिल्लक ५ सामन्यांपैकी ३ सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.
(8 / 10)
लखनौ सुपर जॉयंट्स -लखनऊ सुपर जॉयंट्सचे ९ सामन्यात ५ विजयासाह १० अंक आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी असलेल्या लखनऊला प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी शिल्लक ५ सामन्यांपैकी ३ सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.(HT_PRINT)
कोलकाता नाइट रायडर्स -अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील केकेआर ८ सामने खेळून ६ अंकासह सातव्या स्थानावर आहे. केकेआरला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवावा लागेल. तरच त्यांचे आव्हान जिवंत राहील.
(9 / 10)
कोलकाता नाइट रायडर्स -अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील केकेआर ८ सामने खेळून ६ अंकासह सातव्या स्थानावर आहे. केकेआरला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवावा लागेल. तरच त्यांचे आव्हान जिवंत राहील.(PTI)
राजस्थान रॉयल्स -यंदा राजस्थान रॉयल्सचे प्रदर्शनही काही खास राहिलेले नाही. संघाने ९ सामन्यात केवळ २ विजय नोंदवले आहेत. गुणतालिकेत हा संघ ४ अंकांसह आठव्या स्थानावर आहे. राजस्थानने शिल्लक राहिलेले ५ सामने जिंकून १० अंक मिळवल्यास काहीशी शक्यता आहे. मात्र टीमचे नेट रनरेट इतका खराब आहे की, सर्व सामने जिंकूनही त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण दिसत आहे.
(10 / 10)
राजस्थान रॉयल्स -यंदा राजस्थान रॉयल्सचे प्रदर्शनही काही खास राहिलेले नाही. संघाने ९ सामन्यात केवळ २ विजय नोंदवले आहेत. गुणतालिकेत हा संघ ४ अंकांसह आठव्या स्थानावर आहे. राजस्थानने शिल्लक राहिलेले ५ सामने जिंकून १० अंक मिळवल्यास काहीशी शक्यता आहे. मात्र टीमचे नेट रनरेट इतका खराब आहे की, सर्व सामने जिंकूनही त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण दिसत आहे.(AP)

    शेअर करा