logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सोन्याच्या महाल, 3000 कोटींची यॉट; किती श्रीमंत आहेत शेख अल-थानी, ज्यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी तोडला प्रोटोकॉल ?

सोन्याच्या महाल, 3000 कोटींची यॉट; किती श्रीमंत आहेत शेख अल-थानी, ज्यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी तोडला प्रोटोकॉल ?

Updated Feb 18, 2025 07:26 AM IST

google News
    • Qatar Amir Al Thani Net Worth : कतारचे अमीर शेख अल-थानी जे जगातील श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहेत.  त्यांच्याकडे १०० खोल्यांचा सोन्याचा महाल आहे. यात ५०० वाहनांचे पार्किंग, ३००० कोटींची यॉट, फुटबॉल क्लब आणि स्वत:ची खासगी विमानसेवा आहे.
सोन्याच्या महाल, 3000 कोटींची यॉट; किती श्रीमंत आहेत शेख अल-थानी, ज्यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी तोडला प्रोटोकॉल ?

Qatar Amir Al Thani Net Worth : कतारचे अमीर शेख अल-थानी जे जगातील श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहेत. त्यांच्याकडे १०० खोल्यांचा सोन्याचा महाल आहे. यात ५०० वाहनांचे पार्किंग, ३००० कोटींची यॉट, फुटबॉल क्लब आणि स्वत:ची खासगी विमानसेवा आहे.

    • Qatar Amir Al Thani Net Worth : कतारचे अमीर शेख अल-थानी जे जगातील श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहेत.  त्यांच्याकडे १०० खोल्यांचा सोन्याचा महाल आहे. यात ५०० वाहनांचे पार्किंग, ३००० कोटींची यॉट, फुटबॉल क्लब आणि स्वत:ची खासगी विमानसेवा आहे.

Qatar Amir Al Thani Net Worth: कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि कतारमधील राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून अल-थानी भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी हे प्रोटोकॉल तोडून विमानतळावर पोहोचले असून थानी यांचे त्यांनी जंगी स्वागत केले. अल-थानी  यांची  संपत्ती कुबेरपेक्षा कमी नाही.  त्यांच्याकडे १०० खोल्यांचा सोन्याचा महाल आहे. या महालात ५०० वाहनांसाठी पार्किंगची सोय आहे. या सोबतच थानी यांच्या कडे  फुटबॉल क्लब आणि स्वत:ची खासगी विमानसेवा आहे. तर ३००० कोटींची स्वत:ची यॉट देखील आहे. 

शेख तमीम मार्च २०१५ पासून भारत दौऱ्यावर आले आहेत. १८ फेब्रुवारी ला राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ विशेष मेजवानीही आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही ते उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

कोण आहेत शेख तमीम बिन हमद अल-थानी?

शेख तमीम बिन हमद अल-थानी यांचा जन्म १९८० मध्ये झाला. ते कतारचे माजी अमीर हमाद बिन खलिफा अल-थानी यांचे पुत्र आहेत.  २००३ मध्ये त्यांचे मोठे बंधू शेख जसीम यांनी गादीवरील आपला दावा सोडला, त्यानंतर शेख तमीम यांना अधिकृत उत्तराधिकारी घोषित करण्यात आले. २०१३  मध्ये त्यांच्या वडिलांनी राजीनामा दिला, त्यानंतर शेख तमीम कतारचे अमीर झाले. लंडनमधील प्रतिष्ठित हॅरो स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले आणि नंतर रॉयल मिलिटरी अॅकॅडमी सँडहर्स्ट येथून त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतले. १९९८ मध्ये पदवी घेतल्यानंतर ते कतारला परतले आणि लष्करात सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले.

२००३ मध्ये उत्तराधिकारी म्हणून घोषित झाल्यानंतर लगेचच त्यांची कतार सशस्त्र दलाचे डेप्युटी कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी कतारच्या सुरक्षा आणि आर्थिक धोरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि भविष्यातील नेतृत्वक्षमता सिद्ध केली.

संपत्ती आणि शाही जीवनशैली

शेख तमीम हे जगातील सर्वात श्रीमंत राज्यकर्त्यांपैकी एक आहेत. फोर्ब्सनुसार ते जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत राजा आहेत. त्यांची वैयक्तिक संपत्ती सुमारे २.४ अब्ज डॉलर (२०,०००  कोटी रुपये) आहे. अल थानी कुटुंबाची संपत्ती सुमारे ३३५  अब्ज डॉलर (२८  लाख कोटी रुपये) आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांपैकी एक आहेत.

सोन्याने सजवलेल्या दोहा येथील आलिशान रॉयल पॅलेसमध्ये शेख तमीम आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. या विस्तीर्ण मालमत्तेत १५ राजवाडे आणि ५०० हून अधिक गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा आहे. २०१९  मध्ये त्यांनी ओमानमध्ये आणखी एक भव्य राजवाडा बांधला, ज्याची भव्यता दोहाच्या रॉयल पॅलेसइतकीच आहे.

शेख तमीम यांच्याकडे 'द कटारा' नावाची जगातील सर्वात मोठी आणि महागडी नौका आहे. १२४ मीटर लांबीच्या या नौकेची किंमत सुमारे ४० कोटी डॉलर (३३०० कोटी रुपये) इतकी आहे. यात एक हेलिकॉप्टर पॅड आणि अनेक डेक आहेत, ज्यात ३५  पाहुणे आणि ९०  क्रू मेंबर्स बसू शकतात. त्यांच्या राजघराण्याकडे कतार अमीरी फ्लाइट नावाची एक विशेष खासगी विमानसेवा आहे, ज्यात १४ आलिशान विमाने आहेत. त्यापैकी तीन बोईंग ७४७-८ मॉडेल्स आहेत, प्रत्येकाची किंमत ४०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

महागड्या कार आणि फुटबॉल क्लबची आवड

असलेल्या शेख तमीमकडे बुगाटी डिवो, वेरॉन आणि चिरॉन, ला फेरारी अपार्टा, लॅम्बोर्गिनी सेंटेनारियो, मर्सिडीज एएमजी ६×६ आणि रोल्स रॉयस फँटम सारख्या अनेक दुर्मिळ आणि महागड्या गाड्यांचे प्रचंड कलेक्शन आहे. कतारचे राजघराणे हे खेळांचे मोठे चाहते आहेत. शेख तमीम यांनी २००४ मध्ये कतार स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटची (क्यूएसआय) स्थापना केली. २०११ मध्ये क्यूएसआयने फ्रान्सचा प्रतिष्ठित फुटबॉल क्लब 'पॅरिस सेंट जर्मेन' (पीएसजी) विकत घेतला. अलीकडेच, ऑक्टोबर २०२३ मध्ये, क्यूएसआयने पोर्तुगालच्या शीर्ष फुटबॉल क्लब एससी ब्रागामध्ये २१.७% हिस्सा खरेदी केला आहे. 

विभाग

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर