logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लँडिंगदरम्यान विमान उलटले! दुर्घटनेत ७६ प्रवासी झाले जखमी, १७ गंभीर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

लँडिंगदरम्यान विमान उलटले! दुर्घटनेत ७६ प्रवासी झाले जखमी, १७ गंभीर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Published Feb 18, 2025 08:42 AM IST

google News
    • Plane Crash on Toronto : टोरंटो विमानतळावर सोमवारी एक विचित्र अपघात झाला. येथे एक विमान क्रॅश लँडिंग झाले. त्याचवेळी विमान पूर्णपणे उलटले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
toronto airport

Plane Crash on Toronto : टोरंटो विमानतळावर सोमवारी एक विचित्र अपघात झाला. येथे एक विमान क्रॅश लँडिंग झाले. त्याचवेळी विमान पूर्णपणे उलटले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

    • Plane Crash on Toronto : टोरंटो विमानतळावर सोमवारी एक विचित्र अपघात झाला. येथे एक विमान क्रॅश लँडिंग झाले. त्याचवेळी विमान पूर्णपणे उलटले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Plane Crash on Toronto : कॅनडातील टोरंटो विमानतळावर मोठा विमान अपघात झाला आहे. क्रॅश लँडिंगदरम्यान एक विमान पूर्णपणे उलटे झाले. सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही.  डेल्टा एअरचे विमान ४८१९ सोमवारी लँडिंगदरम्यान धावपट्टीवर उलटले. विमानातील ७६ प्रवाशांपैकी १७ जण जखमी झाले आहेत.

सोमवारी अमेरिकेतील मिनेसोटा येथून येणारे विमान टोरंटो विमानतळावर उतरणार होते. मात्र,  लँडिंग दरम्यान, असं काही घडलं की विमान उलटं झालं. काही व्हिडिओंमध्ये लोक विमानातून गुडघ्यावर रांगत बाहेर येतांना दिसत आहेत. यावेळी  विमानतळावर बर्फवृष्टी होत असून जोरदार वारेही वाहत आहेत. अमेरिका आणि कॅनडामध्ये सध्या चक्रीवादळाचा कहर सुरू आहे. क्रॅश लँडिंगनंतर विमानाला आग लागली. त्यावेळी विमानात अनेक प्रवासी  होते. अग्निशमन दलाच्या अनेक पथकांनी तातडीने येऊन आग विझवली.

सुदैवाने कोणत्याही विमानाला या विमानाची धडक बसली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. खराब हवामान, जोरदार वारे यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचे मागील पंख अचानक वळले आणि विमान उलटले. अपघातानंतर तातडीने आपत्कालीन पथके दाखल झाली असून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.

या दुर्घटनेनंतर विमानतळावरील कामकाज काही काळ थांबवण्यात आले होते. त्याचवेळी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता पुन्हा विमानसेवा सुरू झाली. विमानातील एका व्यक्तीने सांगितले की, त्याला बाहेर पडण्यास खूप त्रास होत होता. विमान पूर्णपणे उलटले होते. कॅनडामध्ये रविवारी मोठं हिमवादळ आलं आहे. त्यामुळे कडाक्याची थंडीही पडते. खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे ही रद्द करण्यात आली आहेत.

विभाग

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर