logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News:पाकिस्तानातही नवरात्रीची धामधूम! कराचीच्या रस्त्यांवरील जल्लोष पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का ! व्हिडिओ व्हायरल

Viral News:पाकिस्तानातही नवरात्रीची धामधूम! कराचीच्या रस्त्यांवरील जल्लोष पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का ! व्हिडिओ व्हायरल

Published Oct 10, 2024 01:51 PM IST

google News
    • Viral News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या कराचीचा सांगितला जात असून, जिथे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे.
पाकिस्तानातही नवरात्रीची धामधूम! कराचीच्या रस्त्यांवरील जल्लोष पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का ! व्हिडिओ व्हायरल

Viral News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या कराचीचा सांगितला जात असून, जिथे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे.

    • Viral News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या कराचीचा सांगितला जात असून, जिथे नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे.

दांडिया खेळण्यात तरुणाई मग्न आहे. ३ ऑक्टोबरपासून या उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल शेजारच्या पाकिस्तानातही नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. या उत्सवाचा सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडिओ 'आयएमधीराजमानधन' नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कराचीतील एका मंदिरात भाविकांनी दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे आणि तेथे भव्य पूजा देखील केली जात आहे. दुर्गामातेचा मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले आहे. तर येथील रस्ते हे गर्दीने फुलले आहेत.

पाकिस्तानातील एका युट्यूब इन्फ्लुएंसरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर युट्यूबरने लिहिले की, "पाकिस्तानातील कराचीमध्ये नवरात्रीचा चौथा दिवस आहे. मंदिरे, गुरुद्वारा, मशिदी आणि चर्च या परिसरात जवळच आहेत. या ठिकाणाला मिनी इंडिया म्हणतात, पण मी या परिसराला पाकिस्तान म्हणतो.

सोशल मीडियावर या व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाइक केला असून त्यावर कमेन्ट देखील केल्या आहेत. अल्पावधीतच या व्हिडिओला १.२७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर १२,६०० हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अनेक सोशल मीडिया युजर्सनी लिहिले की, "हा पाकिस्तान आहे आणि मला येथे विविधता, शांतता आणि एकता पाहायची आहे. कुणीतरी म्हटलं, "खरा नवरात्रोत्सव कराचीत दिसतो. पाकिस्तानात अशा प्रकारे नवरात्र ोत्सव साजरा होईल, अशी अपेक्षा नव्हती, असेही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

पाहा हा व्हायरल व्हिडिओ.

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर