logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त! नव्या कायद्याद्वारे नियुक्त होणारे ठरणार पहिलेच आयुक्त

ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त! नव्या कायद्याद्वारे नियुक्त होणारे ठरणार पहिलेच आयुक्त

Updated Feb 18, 2025 07:11 AM IST

google News
    • Gyanesh Kumar appointed CEC : ज्ञानेश कुमार यांची  भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे. नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे ते  पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सोमवारी निवड समितीची बैठक झाली.
ज्ञानेश कुमार होणार नवे मुख्य निवडणूक आयुक्त! नव्या कायद्याद्वारे नियुक्त होणारे ठरणार पहिलेच आयुक्त

Gyanesh Kumar appointed CEC : ज्ञानेश कुमार यांची भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे. नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सोमवारी निवड समितीची बैठक झाली.

    • Gyanesh Kumar appointed CEC : ज्ञानेश कुमार यांची  भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे. नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे ते  पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सोमवारी निवड समितीची बैठक झाली.

Gyanesh Kumar appointed CEC : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  यांचा केंद्रीय निवडणूक आयोगातील कार्यकाळाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना बढती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या जागी ज्ञानेश कुमार काम पाहतील. १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार गेल्या वर्षी मार्चपासून निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते.  

ज्ञानेश कुमार हे नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. नव्या कायद्यात निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या नियुक्तीप्रक्रियेत सरन्यायाधीशांऐवजी गृहमंत्र्यांचा निवड समितीत समावेश करण्यात आला आहे.

निवड समितीने त्यांचे नाव निश्चित करून राष्ट्रपतींकडे शिफारसीसाठी पाठवले होते. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता. त्यांनी आज बैठक घेऊन हा निर्णय घेतला.

मुख्य निवडणूक आयुक्त निवडीची बैठक सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने सरकारकडे केली होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबाबत काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या वक्तव्यापूर्वी झालेल्या निवड समितीच्या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते.

६१ वर्षीय ज्ञानेश कुमार हे यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयात कार्यरत होते. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यासाठी आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार करण्यात मदत करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी होती. त्यावेळी ते गृहमंत्रालयाच्या काश्मीर विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते.

वर्षभरानंतर गृहमंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रेही हाताळली.

कोण आहेत ज्ञानेश कुमार ? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ज्येष्ठ नोकरशहा ज्ञानेश कुमार यांची भारताचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ज्ञानेश कुमार हे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. मोदींशिवाय केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचाही निवड समितीत समावेश होता. देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे यावर्षी बिहारमधील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असेल. निवड समितीत सहभागी असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा घाईघाईने होत असल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.

केरळ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम केले आहे. ऑगस्ट २०१९  मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०  रद्द करण्यासाठी आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात कुमार यांचा सहभाग होता. त्यावेळी ते गृहमंत्रालयात संयुक्त सचिव (काश्मीर विभाग) होते. तिहेरी तलाक निर्मूलनाच्या मसुदा समितीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

वर्षभरानंतर गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कुमार यांनी अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान संबंधित कागदपत्रे हाताळण्याची जबाबदारी स्वीकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हे गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. सहकार मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत असताना गेल्या वर्षी जानेवारीत ते निवृत्त झाले. अमित शहा हे मंत्रालय सांभाळत आहेत. याआधी ज्ञानेश कुमार यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्रालयातही काम केले आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले कुमार यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये B.Tech पदवी घेतली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट्स ऑफ इंडियामधून त्यांनी बिझनेस फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहे. आग्रा येथील विजय कॉलनीत राहणारा कुमार यूपी बोर्डातून दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. ते डॉक्टरांच्या कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबात अनेक पिढ्यांपासून लोक डॉक्टर बनत होते. मात्र, ज्ञानेश कुमार यांनी वेगळा मार्ग निवडला.

विभाग

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर