भिंत कोसळून ७ मजुरांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेल्याची भीती, बचावकार्य सुरू
Oct 12, 2024, 07:09 PM IST
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या अपघातात अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या अपघातात अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या अपघातात अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. कडी तालुक्यातील जसलपूर गावाजवळ एका कंपनीची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. अजूनही चार ते पाच कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एका कारखान्यासाठी भूमिगत टाकी बसविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अचानक भिंत कोसळली आणि घटनास्थळी काम करणारे कामगार अडकले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिका आणि पोलिसांची पथकेही घटनास्थळी दाखल आहे आहे.
कडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हादसिंह वाघेला यांनी सांगितले की, जसलपूर गावात एका कंपनीसाठी भूमिगत टाकीसाठी अनेक मजूर खड्डा खोदत असताना हा अपघात झाला आणि ते जिवंत गाडले गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसलपूर गावात एका कारखान्यासाठी भूमिगत टाकी खोदत असताना माती खचली व ढिगाऱ्याखाली कामगार गाडले हेले. ढिगाऱ्याखालून सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही तीन ते चार मजूर मातीखाली गाडले असण्याची शक्यता आहे. स्टील आयनॉक्स स्टेनलेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत झालेल्या अपघातानंतर जेसीबीच्या सहाय्याने माती काढण्यात येत आहे.
दुसरीकडे, मेहसाणाचे डीडीओ डॉ. हसरत जस्मिन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, येथे एका खासगी कंपनीचे बांधकाम सुरू होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास हा अपघात झाला. येथे ९ ते १० लोक गाडले गेले होते. त्यापैकी ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. येथे एक १९ वर्षीय मुलगाही अडकला असून त्याची सुटका करण्यात आली आहे. ते म्हणाले की, येथे ८-९ लोक काम करत होते. अजूनही २-३ जण अडकले आहेत.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख -
पंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. गुजरातमधील मेहसाणा येथे भिंत कोसळून झालेला अपघात अत्यंत दु:खद आहे. यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रती माझी तीव्र संवेदना आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. मी जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात घराची भिंत कोसळून ३५ वर्षीय महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. हिंमतनगर तालुक्यातील राजपूर गावात गुरुवारी पहाटे ही घटना घडली होती. शिल्पा परमण (वय ३५) आणि त्यांचा मुलगा क्रिश (वय ९) अशी मृतांची नावे आहेत.
विभाग