ठरलं! उद्या जाहीर होणार महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव; ‘हे’ दोन नेते करणार घोषणा
Dec 02, 2024, 05:16 PM IST
maharashtra cm : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोघे नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत.
maharashtra cm : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोघे नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत.
maharashtra cm : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोघे नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अजून मुख्यमत्र्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. एकनाथ शिंदे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे निश्चित असले तरी कोण होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आता महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी भाजपच्या गोटातून हालचाली वाढल्या आहेत. मुंबईत व दिल्लीत महायुतीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटाने त्यांच्या विधीमंडळाच्या नेत्यांची निवड केली आहे. त्यानंतर आता भाजपच्या विधीमंडळ नेत्याची उद्या (मंगळवार) पक्षाच्या निरीक्षकाकडून निवड केली जाणार आहे. यासाठी भाजपने निरीक्षकांची निवड केली आहे. भाजपने आधीच स्पष्ट केले आहे की, जो नेता विधीमंडळ नेतेपदी निवडला जाईल तोच मुख्यमंत्री असेल.
भाजपने निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्य़मंत्री विजय रुपाणी(Vijay Rupani) आणि केंद्रीय अर्थमंत्रीनिर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांची नेमणूक केली आहे. या निरीक्षकाकडून उद्या म्हणजे मंगळवारी विधीमंडळ नेते,प्रतोदवगटनेत्याची निवड केली जाणार आहे.
भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व कुणाला निरीक्षक म्हणून पाठविणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. कारण शीर्षस्थ नेतृत्वाकडून निरीक्षकांना नेता निवडीबाबत संदेश दिलेला असणार हे उघड आहे. ज्या नेत्याची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड होईल, तोच नेता राज्याचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोघे नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करणार आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या नावाला हिरवा कंदील?
राज्याच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दर्शविल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर संबंधित नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. यासाठी भाजपकडून दोन पक्षनिरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या दोघांच्या निरीक्षणाखाली महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले तरी त्यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कमोर्तब करण्यात आलेले नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होणार का? हा प्रश्नही अद्याप गुलदस्त्यात असून शिंदे गृहमंत्रालयासाठी अडून बसल्याचे सांगितले जात आहे.