logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Accident : अमरावतीमध्ये २ कारची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ३ गंभीर

Amravati Accident : अमरावतीमध्ये २ कारची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ३ गंभीर

Dec 02, 2024, 06:56 PM IST

google News
  • Amravati Road Accident : अमरावतीमध्ये दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

अमरावतीमध्ये २ कारची समोरासमोर धडक

Amravati Road Accident : अमरावतीमध्ये दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Amravati Road Accident : अमरावतीमध्ये दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

अमरावतीमधील दर्यापूर-अकोला मार्गावर दोन कारची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिलह्यातील दर्यापूर -अकोला मार्गावर सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. दोन कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी येवडा पोलिसांनी धाव घेत मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पोस्मार्टमसाठी  आणण्यात आले. रुग्णालयाबाहेर मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

आनंद बाहकर (२६ वर्षे रा. सांग्लुडकर नगर), बंटी बिजवे (३८ वर्षे रा. गजानन मंदिर साईनगर),  प्रतीक बोचे (३५ वर्षे रा. सांग्लुडकर नगर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर कार मधील चौथा पप्पू घाणीवाले जखमी झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल हे दोघे जण जखमी झाले आहेत. प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे चौघे एका कारने अकोल्याला जात होते. तर विरुद्ध दिशेने आकाश आणि रमेश अकोल्यावरून दर्यापूरकडे जात होते.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या दोन्ही कार एकमेकांवर आदळल्या. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला व तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरूळित करत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. एका जखमीवर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आकाश अग्रवाल आणि रमेश अग्रवाल या पितापुत्रांवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर
दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या