शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राहुल जगताप यांच्यानंतर आणखी एक वजनदार नेता अजित पवारांच्या गळाला
Dec 02, 2024, 02:24 PM IST
- Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या १० जागा जिंकणाऱ्या शरद पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या १० जागा जिंकणाऱ्या शरद पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
- Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या १० जागा जिंकणाऱ्या शरद पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अवघ्या १० जागा जिंकणाऱ्या शरद पवार यांच्या व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राहुल जगताप हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अपूर्व हिरे यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली असून ते देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना निवडणूक झाल्यानंतरचा हा मोठा धक्का बसणार आहे.
राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे राहुल जगताप यांनी शरद पवारांच्या पक्षात जाणे योग्य मानलं. विधानसभा निवडणुकीत त्यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. मात्र, महाविकास आघाडीच्या सहमतीने ही जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला देण्यात आली. मात्र, जगताप यांनी बंड पुकारत येथून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.
उमेदवाराचा निर्णय श्रीगोंद्यात घ्यावा, असे ते म्हणाले. मुंबईतून निर्णय घेणं चुकीचं आहे. यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. येथील तिरंगी लढतीत भाजपचे उमेदवार विजयी झले. तर राहुल जगताप यांचा पराभव झाला. मात्र, आता राहुल जगताप हे अजित पवारांसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. राहुल जगताप हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशा परिस्थितीत बंडखोर म्हणून निवडणूक लढवून आता ते अजित पवारांच्या गटात गेल्यास शरद पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जाणार आहे.
तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अपूर्व हिरे यांनी देखील अजित पवार यांची आज भेट घेतली. अपूर्व हिरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटातच होते. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्या प्रचार करण्यासाठी अपूर्व हिरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांचा दारुण पराभव केला. अपूर्व हिरे यांनी मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ते देखील पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या उमेदवारांना केवळ १० जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीच्या एकूण जागांची संख्याही ५० पेक्षा कमी आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकट्याने ४१ जागा जिंकल्या. तर भाजपने लढवलेल्या १४८ जागांपैकी १३२ जागा ९० टक्के स्ट्राईक रेटने जिंकल्या. या अर्थाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका राष्ट्रवादी-शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बसला आहे. शरद पवार यांच्या पक्षाला आता पर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासात एवढ्या कमी जागा कधीच जिंकल्या नव्हत्या.