logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी! नव्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळावरही आज शिक्कामोर्तब होणार?

आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी! नव्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळावरही आज शिक्कामोर्तब होणार?

Dec 03, 2024, 09:38 AM IST

google News
    • Maharashtra CM : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची जोरदार तयारी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे. शपथविधीची  वेळ निश्चित करण्यात आली असून ५ तारखेला संध्याकाळी हा सोहळा होणार आहे.  मात्र, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी! मुख्यमंत्रीपदासह आज मंत्रीमंडळ अंतिम होण्याची शक्यता

Maharashtra CM : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची जोरदार तयारी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे. शपथविधीची वेळ निश्चित करण्यात आली असून ५ तारखेला संध्याकाळी हा सोहळा होणार आहे. मात्र, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    • Maharashtra CM : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची जोरदार तयारी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे. शपथविधीची  वेळ निश्चित करण्यात आली असून ५ तारखेला संध्याकाळी हा सोहळा होणार आहे.  मात्र, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Maharashtra CM : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर सुरू आहे. या साठी भव्य मंडप उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. हा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.  मात्र, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड ४  डिसेंबर रोजी सकाळी १०  वाजता करणार आहे. केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. भाजपचे जे नवनिर्वाचित आमदार नवे नेते म्हणून निवडून येतील, ते ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात शपथ घेतील. मात्र, भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षनेते होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी अजित पवार हे राष्ट्रवादीचे असतील, तर शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप निश्चित केलेले नाही. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी ठाण्यात परतले. आजारी पडल्यानंतर ते आपल्या गावी गेले होते, त्यामुळे सत्तास्थापनेची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्यापूर्वी कॅबिनेट खात्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अद्याप बैठक झालेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील उपस्थितीदरम्यान फडणवीस यांनी भाजपच्या अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. यामध्ये पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन यांच्यासह अनेक आमदारांचा यात समावेश आहे. नव्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग म्हणून या बैठकांकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे सोमवारी पक्षनेत्यांची ही भेट घेत होते. मात्र नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिंदे यांच्या सभा रद्द करण्यात आल्या. मात्र, शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन यांनी नंतर ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

गोळ्या घालत्या तरी मतपत्रिकेवरच मतदान घेणार! मारकटवाडीकर निर्णयावर ठाम; गावात जमावबंदीचे आदेश

कोण कोण घेणार शपथ ? 

सेनेचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये सहभागी होतील, असा विश्वास भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आहे. शपथविधी सोहळ्याला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे किती मंत्री शपथ घेतील हे आता ५ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.  

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर
दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या