मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून केलं ब्लॅकमेल! मुंबईत १४ वर्षांच्या मुलीवर ५६ वर्षांच्या नराधमानं केला बलात्कार
Dec 02, 2024, 11:28 AM IST
- Mumbai Crime: मुंबईत एका मुलीचे तिच्या मित्रासोबत बोलत असतांनाची ऑडिओ क्लिप तयार करून ती तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.
Mumbai Crime: मुंबईत एका मुलीचे तिच्या मित्रासोबत बोलत असतांनाची ऑडिओ क्लिप तयार करून ती तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.
- Mumbai Crime: मुंबईत एका मुलीचे तिच्या मित्रासोबत बोलत असतांनाची ऑडिओ क्लिप तयार करून ती तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.
Mumbai rape Crime: मुंबईत मुली व महिलांवरील अत्याचार सुरूच आहे. एका १४ वर्षीय मुलीचा तिच्या मित्रासोबत बोलतांनाची ऑडिओ क्लिप तिच्या पालकांना दाखवण्याची धमकी देत तिच्यावर एका ५६ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. या व्यक्तिने मुलीला धमकावत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अखेर हा प्रकार मुलीला सहन झाला नाही. तिने या प्रकरणी घरच्यांना माहिती पोलीसांत तक्रार केल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबईच्या अंधेरी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही तिच्या मित्रांसोबत बोलत होती. यावेळी तिच्या संवादाचे चित्रिकरण आरोपीने केले. ही क्लिप तिच्या कुटुंबियांना दाखवण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली. यानंतर त्याने मुलीला त्याच्याशी मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलीचा व्हिडिओ कुटुंबियांना दाखवेन अशी धमकी त्याने मुलीला दिली. यामुळे पीडित मुलगी घाबरली. तिच्या असह्यतेचा फायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला.
हा प्रकार त्याने सुरूच ठेवला. मात्र, अखेर मुलीने हिम्मत करून हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मुलीसह अंधेरी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. यानंतर अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिसांनी आरोपीला व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवरही पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रभारी मुख्यध्यापकाने विद्यार्थीनीशी गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. तब्बल साडे तीन वर्षांपासून त्याने मुलीचा विनय भंग केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची दखल घेत शाळा प्रशासनाने शिक्षकाला निलंबित केलं आहे. अण्णा श्रीरंग नरसिंगे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.