महायुतीचा खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आला समोर, भाजप २२ खाती ठेवणार; शिंदे आणि अजित पवारांना काय मिळणार?
Dec 03, 2024, 04:35 PM IST
Mahayuti Government : महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपकडे गृह तसेच महसूल आदि महत्वाची मंत्रिपदे राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती असण्याची शक्यता आहे.
Mahayuti Government : महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपकडे गृह तसेचमहसूलआदि महत्वाचीमंत्रिपदेराहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडे विधानसभा अध्यक्ष,विधान परिषद उपसभापती असण्याची शक्यता आहे.
Mahayuti Government : महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपकडे गृह तसेच महसूल आदि महत्वाची मंत्रिपदे राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती असण्याची शक्यता आहे.
maharashtra government formation : महायुती २.० सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागांवरून विजय मिळवल्याने सरकारमध्ये त्यांच्याकडे २१ ते २२ मंत्रिपदे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या सरकारच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आता समोर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयावरून भाजप व शिंदे गटात रस्सीखेच सुरू असली तरी गृहमंत्रीपद भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. भाजप गृह विभाग सोडण्य़ास तयार नाही. विधानसभा अध्यक्षपद देखील भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदावर शपथविधीनंतर चर्चा होणार आहे. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाच्य़ा ११ ते १२ आमदारांना तर अजित पवार गटाच्या १० आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभेचा निकाल लागून १० दिवस उलटले तरी राज्याचामुख्यमंत्री कोण होणार, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे.त्यातच भाजपने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वीच पाच डिसेंबरला शपथविधी कार्यक्रमाचे आयोजनकेले आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यातमुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कोणाला कोणती मंत्रिपदे मिळणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपकडे गृह तसेच महसूलआदि महत्वाची मंत्रिपदेराहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती असण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाला अर्थमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास मंत्रिपद मिळू शकते.
त्यानंतर उर्वरित तिन्ही पक्षाच्या बैठकीत मंत्रिपदाची चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर १६ डिसेंबर रोजी नागपुरात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होईल. या बैठकीत नव्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार आहे. दरम्यान, काळजीवाहू एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्आने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे महायुतीच्या अनेक बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.