१५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर... भाजप खासदार धनंजय महाडिकांची महिलांना भरसभेत दमदाटी, VIDEO
Nov 09, 2024, 11:15 PM IST
Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू, असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं आहे.
Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या,नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू, असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं आहे.
Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू, असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. महायुती व महाआघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या प्रचारचा केंद्रबिंदू लाडकी बहीण योजना ठरत आहे. त्यातच भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून महिलांना धमकी दिल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या,नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा,त्यांची ‘व्यवस्था’ आम्ही करू,अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींनाच भरसभेत दमदाटी केली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होतोय.
लोकसभेत मोठा फटका बसल्यानंतर सत्ताधारी महायुती सरकारने विधानसभेच्या तोंडावर महिलांची मते डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आचारसंहितेआधी संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेऊन या योजनेचा प्रचार प्रसार केला. आतापर्यंत महिलांना ५ महिन्यांचे साडे सात हजार रुपये मिळाले आहेत. या माध्यमातून महिलांच्या मतांची पेरणीच सत्ताधाऱ्यांनी केल्याचे बोलले जात आहे. पैसे घेतले तर आम्हालाच मते द्यावी लागतील, अशी इशारावजा धमकी सत्ताधारी गटाचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक नेत्यांनी याआधी दिल्या आहेत. त्यात आता धनंजय महाडिक यांचाही समावेश झाला आहे.
काय म्हणाले धनंजय महाडिक -
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त विधान केले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या,नाव लिहून घ्या आणि आम्हाला पाठवा. त्यांची व्यवस्था आम्ही करू. घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गुण गायचे त्यांचे…असलं चालणार नाही, असे धनंजय महाडिक म्हणाले.
यावर सतेज पाटील यांनी महाडिक यांचा व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी, महिलांना जाहीर सभेत धमकी, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवारयांची भाजपावर टीका -
लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिलांवर पाळत ठेवण्याचे भाजपचे आदेश लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्य काँग्रेसच्या सभेत ज्या महिला दिसतील त्यांचे फोटो काढण्याचे आदेश भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दिलेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची किंमत भाजपने लावली फक्त १५०० रुपये? लाडक्या बहिणीबाबत भाजपची खरी नियत आज समोर आली असे म्हणत सत्तेची मस्ती भाजपवाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे हे महाराष्ट्र बघतोय, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वटेट्टीवार यांनी सुनावले आहे. आमच्या आया बहिणींना भाजपपासूनच धोका आहे,असेही वडेट्टीवार म्हणाले.