logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून कुकर, साड्यांचे वाटप; पोलिसांमध्ये तक्रार

मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून कुकर, साड्यांचे वाटप; पोलिसांमध्ये तक्रार

Nov 09, 2024, 09:20 PM IST

google News
  • Chandivali Assembly Constituency : चांदिवली विधानसभा क्षेत्रातील गणेश नगर येथील मिनी पंजाब हॉटेल येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रेशर कुकर, साड्या, हॉटपॉट व विविध भेट वस्तू वाटप केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या आमदाराकडून कुकर, साड्यांचे वाटप (प्रतिकात्मक छायाचित्र)

Chandivali Assembly Constituency : चांदिवली विधानसभा क्षेत्रातील गणेश नगर येथील मिनी पंजाब हॉटेल येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रेशर कुकर,साड्या,हॉटपॉट व विविध भेट वस्तू वाटप केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

  • Chandivali Assembly Constituency : चांदिवली विधानसभा क्षेत्रातील गणेश नगर येथील मिनी पंजाब हॉटेल येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रेशर कुकर, साड्या, हॉटपॉट व विविध भेट वस्तू वाटप केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी या वेगाने घडत आहेत. त्यातच आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघात प्रेशर कुकर, साड्या व हॉटपॉटचे वाटप केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र निवडणूक आयोगालाही सादर केले गेले आहे.

चांदिवली विधानसभा क्षेत्रातील (Chandivali Assembly Constituency) गणेश नगर येथील मिनी पंजाब हॉटेल (सत्यम बँक्नेट हॉल) येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रेशर कुकर, साड्या, हॉटपॉट व विविध भेट वस्तू वाटप केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याबाबत निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत  म्हटले आहे की,  शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या अधिपत्याखालील रिद्धी-सिद्धी महिला बचत गट व सेवा संस्था या संस्थेच्या मार्फत महिलांना आमिष दाखवत प्रेशर कुकर, साड्या,हॉटपॉट व इतर विविध गृह उपयोगी साहित्याचे वाटप केले गेले.

यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळी, संध्या वढावकर उपस्थित होत्या. त्यावेळी त्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे यांना मतदान करण्याचे आवाहान करीत होत्या,हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे.

याची तक्रार करताच निवडणूक निर्णय अधिकारी भरारी पथक हजर झाले. त्याचप्रमाणे पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली असता पवई पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तेथे असणाऱ्या वस्तू व सीसीटीव्ही फुटेजसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असणारा डी.व्ही. आर. जप्त केला.

 

तेथे जवळपास ३५० महिलांना साड्या व गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला गेला. यामुळे शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे व उपनेत्या मीनाताई कांबळी व संध्या वढावकर त्याचप्रमाणे संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

दिलीप लांडे यांच्यावर यापूर्वीही शासकीय पैशातून प्रेशर कुकर घोटाळा केल्याचा अहवाल मनपाच्या दक्षता विभागाने सादर केलेला आहे. ऐन निवडणुकी काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुह उपयोगी सामान वाटप करीत दिलीप लांडे यांनी सरळ-सरळ आचार संहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे.

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर
दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या