बाबा सिद्दीकींच्या हत्येचा प्लान फसला असता तर पुण्यातील नेत्याला उडवणार होते! बिष्णोई गँगचा 'प्लान बी' उघड
Nov 10, 2024, 06:44 PM IST
- lawrence bishnoi gang plan b revealed : मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन फासला असला तर पुण्यात एका नेत्याची हत्या करण्यात येणार होती. ही माहिती मिळाल्यावर याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.
lawrence bishnoi gang plan b revealed : मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन फासला असला तर पुण्यात एका नेत्याची हत्या करण्यात येणार होती. ही माहिती मिळाल्यावर याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.
- lawrence bishnoi gang plan b revealed : मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन फासला असला तर पुण्यात एका नेत्याची हत्या करण्यात येणार होती. ही माहिती मिळाल्यावर याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.
lawrence bishnoi gang plan b revealed : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिष्णोई गँग असल्याचं पुढं आलं आहे. मात्र, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा प्लॅन फसला असता तर बिष्णोई गँगने प्लान बीदेखील तयार ठेवला होता. मुंबई पोलिसांनी याची माहिती दिली असून बिष्णोई गँगच्या टारगेटवर पुण्यातील एक बडा राजकीय नेता होता. त्याच्या हत्येचा कट बिष्णोई गँगने तयार ठेवला असल्याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली असल्याचे मुंबई क्राईम ब्रांचने सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील आणखी एका नेत्याला लक्ष्य करण्याचा कट उघडकीस आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने पुण्यातील एका नेत्याच्या हत्येचा कट रचला होता आणि 'प्लॅन बी'मधील शूटर्सवर हे काम सोपवण्यात आले होते, असा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुण्यात एका नेत्याला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचने हत्येत वापरण्यात येणारे पिस्तूल जप्त केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मात्र, पुण्यातील या नेत्याचं नाव पोलिसांनी जाहीर केलं नाही. या कटात आरोपी गौरव विलास अपुनेचा पुण्यातील कटात सहभाग होता का, याचाही तपास आता मुंबई गुन्हे शाखा करत आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने गौरव विलास अपुने याला अटक केली आहे.
चौकशीदरम्यान गौरवने सांगितले की, 'प्लॅन बी' लॉरेन्स बिश्नोई टोळीने बनवला होता, जो 'प्लॅन ए' अपयशी ठरल्यास राबवला जाणार होता. त्याने झारखंडला जाऊन दुसरा आरोपी रुपेश मोहाल याच्यासोबत गोळीबाराचा सराव केल्याचे अपुणे याने सांगितले. शुभम लोणकर हा या मागचा मुख्य सूत्रधार होता. गुन्हे शाखेचे अधिकारी आता झारखंडमधील ज्या ठिकाणी गोळीबाराचा सराव करण्यात आला त्या ठिकाणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील नेत्यावर हल्ल्याच्या धमकीचा तपास अद्याप सुरू आहे.